विविध संस्था, संघटनांकडून भारतरत्न डॉ. आंबेडकरांना अभिवादन

विविध संस्था, संघटनांकडून भारतरत्न डॉ. आंबेडकरांना अभिवादन
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा  : समाजातील प्रत्येक घटकाच्या उत्कर्षासाठी मोलाचे कार्य करणारे राज्यघटनेचे शिल्पकार 'भारतरत्न'
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बुधवारी त्यांचे ह्दयपूर्ण स्मरण केले. यानिमित्ताने त्यांच्या विचारांचा जागर घडवितानाच संस्था-संघटनांकडून व्याख्याने, गीतांचे कार्यक्रम, परिसंवाद, आंबेडकरी जलसा… असे वैविध्यपूर्ण कार्यक्रम आयोजिले होते. विविध संस्था-संघटनांच्या प्रतिनिधींनी, राजकीय पक्षातील नेत्यांनी डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
व्याख्यानातून उलगडलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनकार्य…

पुष्पहार अर्पण करून अनुयायांनी केलेले अभिवादन अन् परिसंवादापासून ते चर्चासत्रांमधून अधोरेखित झालेले डॉ. आंबेडकर यांच्या कार्याचे महत्त्व… बुधवारी (दि. 6) पाहायला मिळाले. विविध संस्था-संघटनांच्या प्रतिनिधींनी एकत्र येऊन पुणे रेल्वे स्थानकाजवळील
डॉ. आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करीत, अनुयायांनी मेणबत्त्या प्रज्वलित करीत महामानवाला अभिवादन केले. पुणे रेल्वे स्थानक आणि कॅम्प परिसरातील डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याला विविध संस्था-संघटनांच्या प्रतिनिधींनी, राजकीय पक्षांतील नेत्यांनी पुष्पहार अर्पण करीत अभिवादन केले.

अभिवादन करण्याकरिता पांढर्‍या रंगातील पेहरावात लहान मुले, महिला, पुरुष आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यासाठी सकाळपासूनच गर्दी झाली. परिसरात पुस्तकांचे स्टॉल लावण्यात आले होते, तर संविधानाच्या प्रतींचेही वाटप करण्यात आले. भीमगीतांचे कार्यक्रमही आयोजिले होते. संपूर्ण परिसरात अनुयायांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. यानिमित्त व्याख्यान, चर्चासत्र, गायनाचे कार्यक्रम, रक्तदान शिबिर, गरजूंना मदत असे उपक्रम राबविण्यात आले. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई गट) यांच्या वतीने पुणे रेल्वे स्थानकजवळील डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास संघटनेचे शहर उपाध्यक्ष रवींद्र कांबळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. मनोहर शेलार, गौतम गायकवाड, श्रीकृष्ण भिसे, दादासाहेब पोळ आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसतर्फे डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास उपाध्यक्षा संगीता तिवारी यांनी पुष्पहार अर्पण केला. सुंदर ओव्हाळ, रमा भोसले, सोनिया ओव्हाळ, गौरी काळे, सुवर्णा माने उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने (शरद पवार गट) डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास माजी आमदार अ‍ॅड. जयदेव गायकवाड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. शहराध्यक्ष प्रशांत जगताप, रवींद्र माळवदकर, अंकुश काकडे, कमल ढोले पाटील आदी उपस्थित होते.

शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्षातर्फे शहराध्यक्षा मृणालिनी मदन वाणी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. राजेश्वरी पाटील, प्रभावती भूमकर, विद्या ताकवले, सोनाली उजागरे उपस्थित होते. भारतीय जनता पक्षाच्या पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या वतीने एकता सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक गणेश शेरला यांनी पुष्पहार अर्पण करीत अभिवादन केले. बाळासाहेब शेलार, संदीप गायकवाड, राहुल साळुंखे, सचिन खंडागळे आदी उपस्थित होते.

पुणे जिल्हा बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष धनंजय घोलप यांनी पुष्पहार अर्पण करीत अभिवादन केले, तसेच डॉ. आंबेडकर यांच्या कार्याची माहिती उपस्थितांना दिली. सनी रायकर, अरविंद बहुले, प्रतीक जगताप, खाजाभाई शेख आदी उपस्थित होते. प्रियदर्शनी शिक्षण संस्थेच्या वतीने महेश कुंभार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. शशिकला कुंभार, वर्षाराणी कुंभार उपस्थित होते.
दलित पँथर पुणे जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षा सोनाली दुनघव यांनी पुष्पहार अर्पण करीत अभिवादन केले. रोहन दोडके, करुणा खलुल्ले, बंटी मस्के, रोहित गायकवाड आदी उपस्थित होते.

शिवशक्ती भीमशक्ती सेवा संघाचे अध्यक्ष ऋषीकेश गोहर यांनी पुष्पहार अर्पण करीत डॉ. आंबेडकर यांना अभिवादन केले. राजू बोत, सुभाष माछरे, जितेंद्र जिनवाल, उमेश पाटडिया आदी उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाच्या वतीने शहराध्यक्ष दीपक मानकर आणि कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख यांनी पुष्पहार अर्पण केला. दत्ता सादरे, प्रदीप गायकवाड, दीनेश अर्धाळकर, वीरेंद्र किराड, हरिश लडकत आदी उपस्थित होते. झोपडपट्टी सुरक्षा दलाचे अध्यक्ष भगवानराव वैराट यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. महंमद शेख, काशिनाथ गायकवाड, प्रा. सुरेश धिवार, गणेश लांडगे आदी उपस्थित होते.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news