पुणे : पीएमपीच्या डबल डेकर बसचे भविष्य बोर्ड मीटिंगमध्ये ठरणार

पुणे : पीएमपीच्या डबल डेकर बसचे भविष्य बोर्ड मीटिंगमध्ये ठरणार
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पीएमपी प्रशासन पुणे शहरात  आगामी काळात डबल डेकर बस चालविणार अशी जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र, ही बस शहरात धावणार  की नाही, याबाबतचा अंतिम निर्णय पीएमपी संचालक मंडळाच्या बैठकीत ठरणार आहे. आगामी काळात दोन्ही महापालिका पीएमपीला 100 ई-बस घेऊन देणार आहे. त्यातील 20 बस डबल डेकर मिळाव्यात, अशी पीएमपी प्रशासनाची इच्छा आहे. तशी मागणी पीएमपीने दोन्ही महापालिकांना केली आहे.

मात्र, याबाबतचा प्रस्ताव संचालक मंडळाच्या आगामी बैठकीत मांडण्यात येणार आहे. तो प्रस्ताव संचालक मंडळाने मान्य केला तरच या बसला पुण्यात हिरवा कंदील मिळणार आहे अन्यथा या बसची खरेदी होणार नाही. संचालक मंडळाला या बसला मान्यता देण्यापूर्वी पुणे शहराच्या भौगोलिक स्थितीचा आणि प्रवासी हिताचा विचार करावा लागणार आहे. अन्यथा या बस यापूर्वी पीएमपीने ताफ्यात आणलेल्या जुन्या लाल रंगाच्या वोल्व्हो बसप्रमाणे पांढरा हत्ती ठरतील, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

पीएमपीच्या ताफ्यातील स्व:मालकीच्या बस खूपच कमी झाल्या आहेत. तर ठेकेदारांच्या बसचे प्रमाण वाढत आहे. मागे एकदा ठेकेदारांनी बिलाच्या वादातून संप पुकारला होता. तेव्हा रस्त्यावरील पीएमपीच्या बस दिसेनाशा झाल्या होत्या. पुन्हा जर ठेकेदारांनी अशी वेळ आणली, तर प्रशासनासह प्रवाशांची बिकट अवस्था होईल, त्यामुळे पीएमपीने डबल डेकरपेक्षा सिंगल 12 मीटर लांबीच्या आणि स्व:मालकीच्या बस वाढविण्यावर भर द्यावा, असेही तज्ज्ञांनी म्हटले आहे.

प्रशासनाने फेरविचार करावा
पुणे शहरातील मध्यवस्तीची भौगोलिक रचना पाहिली, तर या डबल डेकर बस पुण्यात धावताना मोठी अडचण निर्माण होणार आहे. त्यामुळे या बस ठराविक लांब पल्ल्याच्या मार्गावर सोडाव्या लागतील. त्यामुळे याचा पुणेकरांना जास्त फायदा होणार नाही. त्यामुळे प्रशासनाने आपला विचार बदलावा, असे पुणेकर प्रवाशांनी म्हटले आहे.

स्व:मालकीच्या बस खरेदी करा
आमदनी अठन्नी आणि खर्चा रुपया… अशी पीएमपीची सध्या स्थिती आहे. पीएमपीला महिना उत्पन्न 50 कोटी आणि खर्च 101 कोटींपर्यंत येत आहे आणि सातव्या वेतन आयोगामुळे आणखी 10 कोटींचा बोजा वाढणार आहे. त्यामुळे दोन्ही मनपाने डबल डेकर बसचा खर्च करण्यापेक्षा संचलन तूटमध्ये वाढ करून द्यावी. त्यासोबतच पीएमपीला सिंगल 12 मीटर, 9 मीटर, 7 मीटर लांबीच्या स्व:मालकीच्या बस खरेदी करून द्याव्यात.

आम्हाला दोन्ही महापालिका 100 ई-बस खरेदी
करून देणार आहेत. त्यापैकी 20 बस डबल डेकर मिळाव्यात, अशी आमची मागणी आहे. त्याचा प्रस्ताव आम्ही संचालक मंडळाच्या समोर ठेवणार आहे. त्यामुळे याबाबतचा अंतिम निर्णय बोर्डाच्या बैठकीनंतरच घेण्यात येईल.
                                                              – ओमप्रकाश बकोरिया, अध्यक्ष 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news