आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या कात्रज येथील कार्यालयात वैद्यकीय मदत कक्ष सुरू आहे. येथे दोन विशेष कार्यकारी अधिकारी काम करीत असून, त्यांना मदतीला कर्मचार्यांची सामान्य प्रशासनाच्या 17 डिसेंबर 2016 च्या शासन निर्णयानुसार नियुक्ती करण्यात आलेली आहे. वैद्यकीय कक्षामार्फत आजपर्यंत हजारो रुग्णांचे प्राण वाचविण्यात आले आहे. दोन विशेष कार्यकारी अधिकारी व कर्मचारी त्या ठिकाणी हे काम करतात व रुग्णांना त्या ठिकाणाहून मदत करतात. कर्मचारी कोणत्याही खासगी कामाकरिता न वापरता रुग्णसेवेसाठी नियुक्त करण्यात आलेले आहेत.– डॉ. राधाकिशन पवार, आरोग्य उपसंचालक