Weather News : गारठा वाढला; तापमान 13.4 अंशांवर | पुढारी

Weather News : गारठा वाढला; तापमान 13.4 अंशांवर

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्यात वाढलेल्या थंडीचा कडका पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि आसपासच्या भागाला चांगलाच बसला आहे. बुधवारी शहराच्या किमान तापमानाचा पारा 13.4 अंशांवर पोहचला, तर पुढील आठवडाभर राहणार आहे. दरम्यान, बुधवारी दिवसभर हवेत गारवा जाणवत होता. उत्तर भारतात वाढलेली थंडी तसेच काही भागात पडत असलेल्या पावसामुळे या भागाकडून राज्याकडे थंड वारे वाह्त आहेत. याच्या परिणामामुळे शहरात थंडी वाढली आहे. दरम्यान, शहरात सकाळी धुळे, ढगाळ वातवरणासह थंडीचा कडका जाणवत आहे. पुढील आठवडाभर थंडी राहून किमान तापमान 9 अंशांवर येण्याची शक्यता आहे. असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

  • आठवडाभर थंडी राहणार
  • किमान तापमानाचा पारा
  • 9 अंशापर्यंत घसरणार

हेही वाचा

Back to top button