

पुणे : बालकांचे लैंगिक शोषण रोखण्यासाठी उपयुक्त ठरलेला ग्रॅव्हिट्स फाउंडेशनचा 'गुड टच बॅड टच' उपक्रम बालकल्याण व शिक्षण विभागाने राज्यभर राबवावा,' अशी सूचना विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्हे यांनी आज येथे केली. ग्रॅव्हिट्स फाउंडेशनच्या संस्थापिका-अध्यक्षा उषा काकडे यांच्या पुढाकाराने 'बाल आरोग्य, विकास व त्यांचे अधिकार' या विषयावरील राज्यस्तरीय परिषदेच्या उद्घाटनावेळी डॉ. गोर्हे बोलत होत्या.
या परिषदेला युनिसेफच्या महाराष्ट्रप्रमुख राजेश्वरी चंद्रशेखर, 'सिम्बायोसिस'च्या संचालिका डॉ. विद्या येरवडेकर, दिग्दर्शिका फराह खान, अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे, इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे, बालनाट्य दिग्दर्शक संजय हळदीकर, बालरोगतज्ज्ञ डॉ. अमिता फडणीस, अॅड. दिव्या चव्हाण, ट्रान्सजेंडर कार्यकर्त्या लक्ष्मीनारायण त्रिपाठी, महिला व बालकल्याण उपायुक्त राहुल मोरे, अतिरिक्त पोलिस महासंचालक (कारागृह) अमिताभ गुप्ता, सामाजिक कार्यकर्त्या जुगनू गुप्ता, ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे यांनी विचार मांडले.
हे ही वाचा :