Pune Crime: गोनवडी येथे तरुणाचा धारधार शस्‍त्राने वार करुन खून; सात तासांत आरोपीला अटक

पौड पोलिसांनी गुन्‍हा दाखल होण्‍याच्‍या अवघ्‍या सात तासांत गुन्‍हयाची उकल करुन आरोपीस अटक केले.
Pune Crime
गोनवडी येथे तरुणाचा धारधार शस्‍त्राने वार करुन खून; सात तासांत आरोपीला अटक File photo
Published on
Updated on

Gonwadi murder case update

पौड: मुळशी धरण भागातील गोनवडी (ता. मुळशी) येथे शनिवारी (दि. २६) सकाळी अज्ञात तरुणाचा धारधार शस्‍त्रानी वार करुन खुन करुन पुरावा नष्‍ट करण्‍यासाठी मृतदेह रस्‍त्‍याच्‍या कडेच्‍या झाडीमध्‍ये टाकून दिलेल्‍या अवस्‍थेत सापडला होता.

पौड पोलिसांनी अवघ्‍या सात तासांत गुन्‍हयाची उकल करत आरोपीस अटक केली आहे. भावानेच सख्‍ख्‍या भावाचा खुन केल्याचे यामुळे उघडकीस आले आहे. ऋषिकेश शिर्के ( वय २३ वर्ष रा.कर्वेनगर, पुणे ) असे मयत व्‍यक्‍तीचे नाव असून त्‍याच्‍या खुन केल्‍याबददल त्‍याचा सख्‍खा भाऊ अनिकेत अनिल शिर्के (वय २६) यास पोलिसांनी अटक केली आहे. (Latest Pune News)

Pune Crime
NGT notice to PMC: समाविष्ट गावांत सहा महिन्यांत सांडपाणी व्यवस्थापन पूर्ण करा; एनजीटीची महापालिकेला नोटीस

याबाबत पौड पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शनिवारी (दि. २६) सकाळी ९.३० वाजणेच्‍या सुमारास मुळशी धरण भागातील गोनवडी येथील चहा टपरीचे मागील बाजुस अज्ञात पुरुषाचे प्रेत पडल्‍याची माहिती मिळाली. पोलिसांनी घटनास्‍थळी पाहणी केली असता अज्ञात आरोपीनी टपरीमध्‍ये धारधार शस्‍त्रांनी डोक्‍याच्‍या मागील बाजुस, मान, गळयावर वार करुन तरुणाचा खुन केला व पुरावा नष्‍ट करण्‍यासाठी टपरीच्‍या मागील बाजुच्‍या झाडीत नेऊन टाकून दिल्‍याचे प्रथमदर्शनी दिसुन येत होते.

मृतदेहाची ओळख पटवणारे कोणतेही कागदपत्र मिळाले नसल्‍याने मयत व्‍यक्‍तीची ओळख पटवणे व आरोपीचा शोध घेणेचे मोठे आव्‍हान पोलिसांसमोर होते. फॉरेन्सीक टीम, श्‍वान पथक, घटनास्थळ पंचनामा, त्याचबरोबर सॅम्पल्स घेण्यात आले.

पुणे ते कोलाड रस्‍त्‍यावरील घटनास्थळाच्या पुढील व पाठीमागील दोन्ही बाजूची सीसीटीव्ही फुटेज तपासले, मृतदेहाची ओळख पटविण्याकरिता मृतदेहाच्या फोटोसह माहिती पोलिसांच्‍या ग्रुपवर पाठवण्‍यात आले. वारजे माळवाडी पोलिस ठाणे येथुन मयत व्‍यक्‍तीची ओळख पटविण्यात आली. त्‍यांनतर वेगाने कारवाई करत पोलिसांनी आरोपीस अटक केली.

मयत ऋषिकेश यास दारूसह इतर व्यसन होते. तसेच तो कोणत्याही प्रकारची काम करत नव्हता. दारू पिऊन घरातील सर्वांनाच नेहमी त्रास देत होता. त्‍यामुळे आरोपी अनिकेत याने ऋषिकेशला शुक्रवारी (दि. २५) रात्री ११ वाजता दारू पिण्यास घेऊन गेला. शनिवारी पहाटे तीन वाजताचे सुमारास धारदार हत्याराच्या साह्याने त्याचा खून करून मृतदेह ओढत नेऊन बाजूला डॅमच्या कडेला झाडामध्ये टाकून दिला. पौड पोलिसांनी गुन्‍हा दाखल होण्‍याच्‍या अवघ्‍या सात तासांत गुन्‍हयाची उकल करुन आरोपीस अटक केले.

Pune Crime
Pune News: चिमुकल्यावर अनैसर्गिक अत्याचार करणार्‍याला दुहेरी जन्मठेप

उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील कुमार पुजारी, वरिष्‍ठ पोलिस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांच्‍या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सुधिर कदम, बालाजी कांबळे, संदिप चव्हाण, पोलिस उपनिरीक्षक समिर शेख, सहायक उपनिरीक्षक सचिन शिंदे, पोलिस हवालदार गणेश लोखंडे, सिध्देश्वर पाटील,प्रशांत बुनगे, वैभव सुरवसे, श्रीकृष्ण पोरे यांच्‍या पथकाने गुन्‍हयाची उकल करुन आरोपीस अटक केली. या कामगिरीबददल पौड पोलिसांचे कौतुक होत आहे. हा मृतदेह मुळशी येथे आपत्ती व्यवस्थापन समितीचे प्रमोद बलकवडे यांनी वीस फूट खड्ड्यातील झुडपातून बाहेर काढून पौड येथे शवविच्छेदनासाठी आणला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news