पिंपरी : दागिने तयार करण्याच्या बहाण्याने सोने पळवले

पिंपरी : दागिने तयार करण्याच्या बहाण्याने सोने पळवले
Published on
Updated on

पिंपरी : दागिने तयार करण्याच्या बहाण्याने कारागिरांनी 17 लाख, 84 हजार 508 रुपये किमतीचे शुद्ध सोने चोरुन नेले. ही घटना 30 मार्च ते 8 एप्रिलदरम्यान जुन्या सांगवीतील कावेडिया ज्वेलर्स व पुण्यातील गणेश पेठेतील ममता निवास येथे घडली. याप्रकरणी रवी जगदिश कावेडिया (36, रा. जुनी सांगवी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, प्रशांत सुनील ससमल (40, रा. पुणे) आणि सुमन अजित ससमल (23. रा. गणेशपेठ, पुणे) यांच्यावर सोने चोरून नेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी व आरोपी एकमेकांच्या परिचयाचे असून, सोन्या-चांदीच्या दुकानात विक्री करण्यासाठी आवश्यक ते दागिने आरोपींकडून तयार करून घेत होते. आरोपींनी फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून, दागिने तयार करण्यासाठी सात लाख, 84 हजार 508 रुपये किमतीचे 296. 430 ग्रॅम वजनाचे शुद्ध सोने घेतले. त्यानंतर दागिने तयार करून न देता ते चोरुन नेत, फिर्यादी कावेडिया यांची फसवणूक केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news