भुकूममधील घरफोडीत सोने, रोकड लंपास

भुकूममधील घरफोडीत सोने, रोकड लंपास

पिरंगुट : पुढारी वृत्तसेवा :  भुकूम (ता. मुळशी) येथे चोरट्यांनी दोन घरे फोडून सोने आणि रोख रक्कम मिळून 1.37 लाखांचा मुद्देमाल चोरून नेला. घराची कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश करीत घरातील लोखंडी कपाट उचकटून सोने आणि रोख रक्कम लंपास केली. ग्रामपंचायतीच्या तसेच खासगी सीसीटीव्हीत चोरटे कैद झाले आहेत. चोरट्यांनी संपूर्ण गावामध्ये पायी फिरून पाहणी केली. त्यानंतर घरफोडी केली. घरफोड्यांमुळे गावात खळबळ उडाली. मागील एक महिन्यापासून मुळशी तालुक्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात चोर्‍यांचे तसेच घरफोडीचे प्रमाण वाढले आहे.

भूगाव परिसरामध्ये चोर्‍यांचे प्रमाण वाढले आहे. नागरिकांनी सोसायटी परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, सुरक्षारक्षक नेमणे, घराला सेफ्टी डोअर बसविणे, ग्रामपंचायतींनीसुद्धा गावच्या प्रवेशद्वारावर नोंदवही ठेवणे, सीसीटीव्ही बसविणे महत्त्वाचे आहे. नागरिकांनी जागरुक राहणे गरजेचे आहे. काही अडचण आली तर तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पौड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनोजकुमार यादव यांनी केले आहे. या घटनेचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी भाऊसाहेब ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनोजकुमार यादव, सहायक पोलिस निरीक्षक सुहास कदम, उपनिरीक्षक सुधीर घुले, हवालदार नितीन गार्डी करीत आहेत.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news