गोखले इन्स्टिट्यूटचे कुलगुरू डॉ. अजित रानडे यांनी अखेर मुदतीपूर्वीच राजीनामा दिला आहे. कुलगुरुपदाची पात्रता नसल्याने त्यांच्यावर आरोप झाल्यानंतर सत्यकथन चौकशीचा अहवाल त्यांच्या विरोधात गेला होता. त्यांनी त्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. तरीही त्यांनी दिवाळीनंतर या पदावारून पायउतार होणे पसंत केले. त्यामुळे गोखले संस्थेत पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
डॉ. रानडे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. तसेच ते कुलगुरुपदासाठी आर्हता प्राप्त नसताना या पदावर कसे निवडले गेले याची तक्रार विद्यापीठ अनुदान आयोगाकडे प्रा. मुरली कृष्णा यांनी केली होती. शेवटी त्यांच्या विरोधात संस्थेचे तत्कालीन दोन कुलपतीनी आदेश दिला होता. त्यात राजीव कुमार आणि ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. बिबेक देबरॉय यांचा समावेश होता. या दोन्ही कुलपतींना संस्थेने रानडे यांच्या विरोधात भूमिका घेतल्याने पदावरुन तडकाफडकी दूर केले होते. ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ व संस्थेचे माजी कुलपती देबरॉय यांना याचा चांगलचा धक्का बसला. त्यांनी
स्वतःहून राजीनामा दिला. ते व्यथित असताना ऐन दिवाळीत देबरॉय यांचे 2 नोव्हेंबर रोजी निधन झाले. त्याचेही पडसाद संस्थेच्या राजकारणावर पडले. अखेर सर्व घटनांची परिणती डॉ. रानडेंच्या राजीनाम्यात झाली.
डॉ. रानडे यांची प्रतिमा वरकरणी जरी स्वच्छ दिसत असली तरी ते सरव्हंटस ऑफ ईंंडियाचे सचिव मिलींद देशमुख यांच्या दबावाखाली शेवटपर्यंत राहिले. ते सांगतील ते काम ते करीत होते. नागपूर येथे सर्व्हन्टस ऑफ इंडिया सोसायटीच्या मालमत्ता फ—ी होल्ड करण्यासाठी दीड कोटी रुपये तसेच मिलिंद देशमुख यांना फौजदारी गुन्हे प्रकरणासाठी सुमारे दहा लाख रुपये असे एकुण सुमारे अडीच कोटी रुपये गोखले इन्स्टिट्यूटमधून अजित रानडे यांनी मंजुर केले. हे प्रकरण संस्थेचे अमरावती येथील सदस्य प्रवीण राऊत यांनी बाहेर काढले. तसेच अॅड. कौस्तुभ पाटील यांनी डेक्कन पोलीस स्टेशन येथे गोखले इन्स्टिट्यूटचे कुलसचिव कपिल जोध, लेखाधिकारी अश्विनी जोगळेकर, डॉ. अजित रानडे व मिलिंद देशमुख यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. आपली पोलखोल अटळ आहे हे लक्षात येताच डॉ. रानडे यांनी अखेर नवनियुक्त कुलपती संजीव सान्याल यांच्याकडे राजीनामा सुपुर्द केला.
संस्थेत पुन्हा खळबळ डॉ. अजित रानडे यांना कुलगुरुपद विद्यापीठ अनुदानाची पात्रता नसताना उपभोगता यावे अशी फिल्डिंग मिलिंद देशमुख यांनी लावली होती. यापूर्वीसुद्धा राजस परचुरे यांच्यामार्फतसुद्धा मिलिंद देशमुख यांनी लाखो रुपये गोखले इन्स्टिट्यूटमधून वैयक्तिक वापरले गेले. तेही प्रकरण कोर्टात सुरू आहे. मी ही बाब सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटीमधील सर्वाच्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला. मात्र मला देखील मिलिंद देशमुख यांनी कटकारस्थान करून संस्थेतून काढण्याचा प्रयत्न केला. अखेर ‘भगवान के घर देर है अंधेर नहीु’ हेच सिद्ध झाले.
प्रवीण राऊत, तक्रारदार
डॉ. रानडे यांच्या राजीनाम्याचे वृत्त दिवाळी संपताच 4 नोव्हेंबर रोजी बाहेर आले. त्यामागे अनेक घटनाक्रम आहेत. प्रामुख्याने माजी कुलपती बिबेक देबरॉय यांचे अचानक झालेले निधन हेही एक कारण असावे अशी चर्चा संस्थेच्या वर्तुळात आहे. कारण देबरॉय हे रानडे यांनी त्यांच्या निकालाविरोधात उच्च न्यालयात गेल्याने नाराज झाले. त्यांना मोठा धक्का बसला. त्यातच त्यांचे दिवाळीत दुःखद निधन झाले. त्यानंतरच रानडे यांनी राजीनामा दिला आहे.