

राजगुरूनगर : पुढारी वृत्तसेवा: तामिळनाडू सरकारने दिलेले वाढीव आरक्षण न्यायालयात टिकले. महाराष्ट्रात ५० वरुन ७० ते ६५ टक्के आरक्षणात वाढ केल्यास सध्याची आंदोलने शांत होतील. सरकारला जमत नसल्यास आम्ही सल्ला देऊ, असा खोचक टोला ज्येष्ठ नेते, खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांनी राज्याच्या त्रिपक्षीय सरकारला दिला.
जळगावमध्ये कंत्राटी पद्धतीने तहसीलदार नेमणूक हा सरकारचा मूर्खपणा आहे. उद्या एखाद्या अशा अधिकाऱ्याने चुकीचे निर्णय घेऊन रेकॉर्ड तयार झाल्यास त्याचे काय होणार? असा प्रश्न उपस्थित करुन पवार यांनी शिंदे, फडणवीस व अजित पवार सरकारवर तोफ डागली. (Sharad Pawar)
जालना येथील मनोज जरांगे – पाटील यांनी सुरू केलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंबा म्हणून खेड तालुक्यातील मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी रविवारी (दि. १) बेमुदत साखळी उपोषण आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज संध्याकाळी भेट दिली.
यावेळी खासदार डॉ. अमोल कोल्हे, देवदत्त निकम, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हिरामण सातकर, अजित पवार गटाचे जिल्हा उपाध्यक्ष अनिलबाबा राक्षे, पंचायत समितीचे माजी सभापती अंकुश राक्षे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शांताराम चव्हाण, जितेंद्र राक्षे, अशोक राक्षे, खेड तालुका एज्युकेशन सोसायटी संचालक बाळासाहेब सांडभोर, दिलिप होले, शंकर राक्षे, जगन्नाथ राक्षे, ॲड. अनिल राक्षे, मनोहर वाडेकर, बहिरवाडीच्या सरपंच वसुधा राक्षे, आीद उपस्थित होते. आंदोलकांनी पवार यांना निवेदन दिले.
हेही वाचा