Baramati News: 10 वीत यश मिळालं, शाळेत पहिली... पण 'ती'च जगात नाही; कारणीभूत ठरला विकृत तरुण, गावात हळहळ

स्वतःचे यश आणि कौतुक सोहळा पाहण्यासाठी तीच या जगात नसल्याबद्दल शोक व्यक्त केला गेला
Baramati News
दहावीच्या परीक्षेत शाळेत प्रथम क्रमांक मिळवला pudhari
Published on
Updated on

girl ended her life got 1st Rank in Exam

बारामती : कोऱ्हाळे खुर्द (ता. बारामती) येथे तरुणांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केलेल्या एका मुलीने नुकत्याच जाहीर झालेल्या दहावीच्या परीक्षेत शाळेत प्रथम क्रमांक मिळविल्याचे स्पष्ट झाले. मंगळवारी (दि. १३) दहावीचा निकाल लागला. त्यात ती मुलगी पहिली आल्याचे कळताच गावात हळहळ व्यक्त करण्यात आली. स्वतःचे यश आणि कौतुक सोहळा पाहण्यासाठी तीच या जगात नसल्याबद्दल शोक व्यक्त केला गेला.

'तू माझ्याशी यात्रेपूर्वी लग्न कर अन्यथा तुझ्या घरच्यांना कोयत्याने उडवून टाकीन' अशी धमकी दिल्याने या मुलीने घरात गळफास घेत आपले जीवन गत महिन्यात संपवले होते. या प्रकरणी तिच्या वडीलांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुख्य आरोपीसह अन्य तिघांविरोधात पोक्सोसह तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा तसेच ॲट्राॅसिटी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Baramati News
SSC Result 2025: वडिलांनी मृत्यूला कवटाळले; आईने कष्टाने शिकवले, दुर्गाने मिळवले 86%

दहावीची परीक्षा संपल्यानंतर तिने २७ मार्चपासून सोमेश्वरनगरला कोर्स सुरु केला होता. त्यासाठी ती रोज ये-जा करत होती. २ एप्रिल रोजी तिने कुटुंबियांना तिला होत असलेल्या त्रासाची माहिती दिली होती. गावातील काही तरुण दुचाकीवरून तिचा पाठलाग करत त्रास देत होते. 'तु जर माझ्याशी बोलली नाही तर तुझ्या घरातील कोणालाही जीवंत ठेवणार नाही, सर्वांची कोयत्याने मुंडकी उडवीन, शिवाय गावच्या यात्रेपूर्वी लग्न कर अन्यथा तुझ्या घरच्यांना संपवणार' अशी धमकी तिला दिली गेली होती. मुख्य आरोपीचे काही मित्र तिला वहिनी असे म्हणून चिडवत त्याला साथ देत होते. तिच्या इन्स्टाग्राम खात्यावर काही मेसेजही पाठवण्यात आले होते.

Baramati News
Pune Crime: आर्थिक वादातून डोक्यात दगड घालून खून; दोघांना अटक

अखेर हा त्रास असह्य झाल्याने तिने ८ एप्रिल रोजी राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली होती. पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपींना अटक केली होती. सध्या ते तुरुंगात आहेत. परंतु आता दहावीच्या निकालानंतर या मुलीच्या यशानंतर पुन्हा या विषयावर चर्चा सुरु झाली आहे. दहावीच्या निकालात तिने ७८.४० टक्के गुणांसह विद्यालयात प्रथम क्रमांक मिळविला. दहावीच्या निकालाची गावात चर्चा झाली, तशी तिच्या आत्महत्येमुळे हळहळही व्यक्त करण्यात आली. विद्यालयात प्रथम आलेली मुलगी यश बघण्यासाठी नाही याची सल ग्रामस्थांनी बोलून दाखवली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news