संतापजनक ! दहा वर्षांच्या मुलीवर 67 वर्षांच्या ज्येष्ठाने केले लैंगिक अत्याचार

हवेली पोलिस ठाण्यात ज्येष्ठ नागरिकावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा
girl was molested by senior citizen
67 वर्षांच्या ज्येष्ठाने अत्याचार केल्याची आपबितीFile Photo
Published on
Updated on

बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर शाळेत ‘गुड टच’ आणि ‘बॅड टच’ची कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेत पाचवीतील एका मुलीने तिच्यावर 67 वर्षांच्या ज्येष्ठाने अत्याचार केल्याची आपबिती सांगितली. यानंतर हवेली पोलिस ठाण्यात ज्येष्ठ नागरिकावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी शुक्रवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास खडकवासला येथील शाळेत पायी चालली होती. नेहमी जाते त्या गल्लीतून ती जात होती, तेव्हा एका घराबाहेर 67 वर्षांचा ज्येष्ठ नागरिक थांबला होता. त्याने अचानक तिला घरात ओढून घेतले. त्यानंतर घराचे दार लावून घेतले. थोड्या वेळाने तिला घराबाहेर सोडून दिले. पीडितेने ही घटना शिक्षकांना सांगितली आणि शिक्षकांनी ती मुख्याध्यापकांना सांगितली. मुख्याध्यापकांनी पालकांना बोलावून घेत तक्रार देण्यास सांगितले. दिलीप नामदेव मते (वय 67) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news