पिंपरी : कार उलटून तरुणीचा मृत्यू, पाचजणी जखमी

पिंपरी : कार उलटून तरुणीचा मृत्यू, पाचजणी जखमी

पिंपरी(पुणे) : भरधाव कार उड्डाण पुलाच्या कठड्याला धडकून उलटल्याने एमबीबीएसच्या शेवटच्या वर्षात शिकणार्‍या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. तर, पाचजणी जखमी झाल्या आहेत. शनिवारी (दि. 29) पहाटे जुन्या पुणे-मुंबई महामार्गालगतच्या मदर तेरेसा उड्डाण पुलावर ऑटो क्लस्टरकडून काळेवाडीकडे जाणार्‍या रस्त्यावर हा अपघात झाला.

कृतिका कौर (23, सध्या रा. महिंद्रा एमकेआर सोसायटी, पिंपरी) असे या अपघातात मृत्यू झालेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. तर, दिगज्योत धिमन (24, महिंद्रा इन्फिनिया सोसायटी, पिंपरी), दृष्टी जिग्नेश ठक्कर (24, ), मणी तोमल (24), अनुष्का यादव (24), लुईस बॅरेटो बेनेझोला (22, सर्व रा. पिंपरी) असे जखमी झालेल्यांची नावे आहेत.

कृतिका शहरातील एका महाविद्यालयात शिकत होती. शनिवारी पहाटेच्या सुमारास कृतिका मैत्रिणींसोबत कारने जात होती. त्या वेळी दिगज्योत धिमन कार चालवत होती. दरम्यान, मदर तेरेसा उड्डाण पुलावर ऑटो क्लस्टरकडून काळेवाडीकडे जाणार्‍या मार्गावरील दुभाजकाला त्यांची कार धडकली. वेग जास्त असल्याने कार उलटून अपघात झाला. अपघातात गंभीर जखमी कृतिका कौर हिचा जागीच मृत्यू झाला. तर, इतर चारजणी जखमी आहेत. याप्रकरणी कारचालक दिगज्योत धिमनवर गुन्हा दाखल केला आहेत. याप्रकरणी पोलिस शिपाई सोमनाथ मुठे यांनी फिर्याद दिली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news