Pune Crime News: इन्स्टाग्रामवरून मैत्री करणे पडले महागात आधी ओळख वाढली मग ब्लॅकमेल अन् मग...

फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
Pune Crime News
इन्स्टाग्रामवरून मैत्री करणे पडले महागात आधी ओळख वाढली मग ब्लॅकमेल अन् मग...Pudhari Photo
Published on
Updated on

पुणे: तरुणीशी इन्स्टाग्रामवर ओळख निर्माण करून तिला लॉजवर नेऊन तिच्या गळ्यातील अडीच तोळ्याची सोनसाखळी पाहण्यास घेऊन ती परत देण्यासाठी तिला शरीर संबंधात भाग पाडणार्‍या व नंतर तिचा गर्भपात घडवून आणणार्‍या एकावर फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

सौरभ धोत्रे (वय 25, रा. वडारवाडी, दीपबंगला चौक) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याबाबत 21 वर्षीय तरुणीने पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. हा प्रकार मे 2024 ते फेब्रुवारी 2025 दरम्यान घडला.

Pune Crime News
Pune Crime News: महिलेचे आक्षेपार्ह व्हिडीओ प्रसारित करणार्‍याला अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मे 2024 मध्ये फिर्यादी आणि तरुणीची इन्स्टाग्रामवर ओळख झाली. त्यातून त्याने तरुणीला भेटण्यास बोलवून तिला एका लॉजवर नेले. तेथे तिला तिच्या गळ्यातील अडीच तोळ्याची सेानसाखळी पाहण्यास मागितली. त्यानंतर ती सोनसाखळी परत करण्यासाठी त्याने तिच्या इच्छेविरोधात तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. यानंतर तरुणी गर्भवती राहिल्यानंतर तिला गर्भपात करण्यास भाग पाडले.

Pune Crime News
E-governance Reforms: ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात पुणे महापालिका राज्यात अव्वल

आरोपीने तिची सोनसाखळी परत न केल्याने त्याने तिच्यासोबत बोलणे बंद केल्याणे व भेटणे बंद केल्याने त्याने तरुणीचा बनावट इन्टाग्राम आयडी तयार केला. त्यावरती तरुणीचे व आरोपी सोबतचे फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच, आरोपीने तरुणीच्या वडिलांच्या दुकानावर जाऊन 70 हजार रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास आरोपीने त्याचे आणि तरुणीचे फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news