

भवानीनगर: इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील 14 गावांसाठी पवारवाडी ग््राामपंचायतीच्या अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या उद्धट प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेत जलजीवन मिशनचे काम सुरू आहे. मात्र, या कामात होत असल्याचा आरोप असलेल्या अनियमितता आणि ग््राामस्थांना न घेता होत असलेल्या निर्णयांमुळे घोलपवाडीतील ग््राामस्थांचा तीव विरोध निर्माण झाला आहे.
14 गावांसाठी असलेल्या या प्रादेशिक योजनेतील तलाव आणि पाण्याच्या टाक्यांच्या बांधकामाबाबत ग््राामस्थांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. नियोजित ठिकाणाऐवजी इतर ठिकाणी तलाव व टाक्या बांधल्या जात असल्याचा आरोप ग््राामस्थांनी केला आहे. पवारवाडी ग््राामपंचायतीने तात्पुरत्या तलावासाठी दिलेल्या जागेची मंजुरी नंतर ’पक्का तलाव’ म्हणून करण्यात आल्याने नागरिकांमध्ये संताप वाढला आहे.
काही दिवसांपूर्वी पवारवाडीतील ग््राामस्थांनी या प्रकल्पातील अनियमिततेविरोधात उपोषणही केले होते. त्या वेळी कार्यकारी अभियंता अर्जुन नाडगवडा आणि उपविभागीय अभियंता माधवी गरुड यांनी भेट देऊन उदमाई देवी मंदिर परिसरातील पाण्याच्या टाकीचे व साठवण तलावाचे काम तात्पुरते स्थगित केले होते. मात्र, दोन महिन्यांनंतर जिल्हाधिकारी कार्यालयात ग््राामस्थांना न बोलावता बैठक घेऊन स्थगिती उठविण्यात आली आणि काम पुन्हा सुरू करण्यात आले. यावर ग््राामस्थांनी तीव नाराजी व्यक्त केली आहे.
घोलपवाडीतील महत्त्वाची जागा तसेच उदमाई देवी मंदिराचे आवार या योजनेसाठी वापरले जात असल्याने स्थानिकांमध्ये नाराजी पसरली आहे. अनेक वर्षांपासून एका तलावावर आधारित योजना असताना, अचानक दोन तलावांची गरज का निर्माण झाली, असा प्रश्न ग््राामस्थ विचारत आहेत. प्रस्तावित तलावाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होण्याची शक्यता असल्याने पर्यावरणीय हानीबाबतही स्थानिकांनी चिंता व्यक्त केली आहे.
या प्रकल्पासाठी घोलपवाडीतील सुमारे 5 एकर जागा आरक्षित करण्यात आली आहे. या जागेच्या अभावी भविष्यात देवी यात्रेसह गावातील इतर विकासकामांसाठी जागा उरणार नसल्याने ग््राामस्थांनी तीव विरोध दर्शवला आहे. लवकरच याविरोधात मोठे आंदोलन छेडण्याचा इशाराही ग््राामस्थांनी दिला आहे.