औंधमध्ये मिनी मार्केटचा घाट! महापालिकेकडून प्रस्ताव तयार; नागरिकांचा विरोध

औंधमध्ये मिनी मार्केटचा घाट! महापालिकेकडून प्रस्ताव तयार; नागरिकांचा विरोध
Published on
Updated on

[author title="मोहसीन शेख" image="http://"][/author]

बाणेर : पुढारी वृत्तसेवा : औंध येथील परिहार चौकातील पादचारी मार्गाची जागा शिवदत्त मिनी मार्केट या संस्थेला 11 वर्षांच्या भाडे करारावर दिली होती. हा करार 2013 मध्ये संपल्यानंतरदेखील संस्थेने जागेवर बेकायदा ताबा कायम ठेवला आहे. या ठिकाणी वाहतूक कोंडी होत असल्यामुळे या मार्केटला नागरिकांचा विरोध आहे. मात्र, महापालिका प्रशासनाने आता पुन्हा या मार्केटच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव तयार केल्याने हा प्रस्ताव नेमका कुणाच्या फायद्यासाठी आहे, असा सवाल नागरिकांकडून होत आहे. करार संपल्यामुळे या संस्थेस मुदतवाढ देऊ नये अथवा नवीन करार करू नये, असा अभिप्राय महापालिकेच्या मालमत्ता विभागाने दिलेला आहे. हा रस्ता 24 मीटर रुंदीचा असून, येथे रस्ता रुंदीकरण प्रस्तावित आहे.

तसेच, हा भाग 'नो हॉकर झोन' असल्याने परिहार चौकात दररोज वाहतूक कोंडी होते आहे. त्यामुळे या संस्थेला मुदतवाढ देण्यात येऊ नये, असा अभिप्राय 2016 मध्ये अतिक्रमण विभागानेही दिला आहे. माजी अतिरिक्त आयुक्त शीतल उगले यांनी शिवदत्त मिनी मार्केटची जागा महापालिकेच्या ताब्यात देण्याचे आदेश गेल्या काळात दिले होते. या संस्थेचे पुनर्वसन हे नियमानुसार क्रमप्राप्त नसून ते पुनर्वसन करू नये, याबाबत या प्रभागाच्या चारही माजी नगरसेवकांनी त्यांच्या कार्यकाळात महापालिका आयुक्तांना वेळोवेळी पत्र दिलेले आहे. पुनर्वसनाचा प्रस्ताव तयार करण्यात आल्याने 'प्रशासक राज'मध्ये अधिकारी मनमानीपणे निर्णय घेत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.

मार्केटच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव

शिवदत्त मिनी मार्केटचे याच ठिकाणी पुनर्वसन करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेला हा प्रश्न मार्गी लागून येथील रखडलेले काम पूर्ण होईल. 'स्मार्ट सिटी'ने आखणी केलेल्या पदपथानुसार हे काम केले जाणार आहे. हे मार्केट कमी जागेत बसवून वाहतुकीला अडथळा होणार नाही, तसेच वाहाने पार्क होणार नाहीत, यासाठी या भागात 'नो पार्किंग झोन' तयार केला जाणार असल्याचे मालमत्ता विभागाचे अधिकारी माधव जगताप यांनी सांगितले.

परिहार चौकाच्या शेजारी पूर्णपणे विकसित न झालेल्या 24 मीटर डीपी रस्त्याच्या उपलब्ध जागेपैकी पादचारी मार्गाची जागा शिवदत्त मिनी मार्केट या संस्थेला भाडे करारावर दिली होती. मात्र, हा रस्ता अरुंद असल्याने या ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे या मार्केटच्या पुनर्वसनाची प्रक्रिया तातडीने थांबविण्याची मागणी आयुक्त राजेंद्र भोसले यांच्याकडे केली आहे.

– अर्चना मुसळे, माजी नगरसेविका

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news