Chandrakant Patil on Gautami Patil
पुणे : गौतमीला उचलायचं की नाही? असा सवाल कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे. प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलच्या गाडीचा आणि रिक्षाचा अपघात प्रकरणी आमदार पाटील यांनी थेट डीसीपी संभाजी कदम यांना फोन केला. त्यांनी अपघातातील दोषींवर कडक कारवाई करण्याचे निर्देश डीसीपींना दिले आहेत. त्यामुळे गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
दोन दिवसांपूर्वी वडगाव बुद्रुक येथे एक अपघात झाला होता. एका रिक्षाला गाडीने धडक दिली होती. अपघातात रिक्षा चालक विठ्ठल मरगळे हे गंभीर जखमी झाले आहेत. हे अपघातग्रस्त वाहन गौतमी पाटीलच्या नावावर असल्याने पुणे पोलिसांनी तिला नोटीस बजावली आहे. त्यामुळे तिच्यावर कायदेशीर कारवाईची टांगती तलवार आहे.