Nilesh Ghaiwal: निलेश घायवळच्या अडचणीत वाढ, पासपोर्टच रद्द; पोलिसांचा दणका

Nilesh Ghaiwal Passport: निलेश घायवळने 2019 मध्ये अहिल्यानगर पोलिसांकडून पासपोर्ट काढल्याचे समोर आले होते.
Nilesh Ghaiwal Passport
Nilesh Ghaiwal Passport RowPudhari
Published on
Updated on

Pune Gangster Nilesh Ghaiwal Passport Cancelled

पुणे : पुण्यातून परदेशात पळालेला गुंड निलेश घायवळच्या अडचणीत भर पडली आहे. गुरुवारी पुणे पोलिसांच्या अहवालानंतर पासपोर्ट प्रादेशिक कार्यालयाने निलेश घायळवला दणका देत पासपोर्ट रद्द केला.

पुण्यातील कोथरुड येथे 17 सप्टेंबररोजी 'दुचाकीला जाण्यासाठी साईड दिली नाही' या किरकोळ कारणावरून प्रकाश धुमाळवर (वय 36) गोळीबार केल्याची घटना घडली होती. या घटनेतील आरोपी निलेश घायवळ टोळीशी संबंधित असल्याचे उघड झाले होते. या घटनेनंतर निलेश घायवळ अडचणीत आला आहे.

Nilesh Ghaiwal Passport
Chandrakant Patil Nilesh Ghaywal link: चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयातून गुन्हेगारांशी संपर्क? – धंगेकरांचा सनसनाटी आरोप

सध्या परदेशात पळालेल्या निलेश घायवळ याच्या साथीदारांच्या मुसक्या आवळल्या जात असतानाच दुसरीकडे निलेशचा पासपोर्ट रद्द करण्यासाठी हालचाली सुरू होत्या. निलेशचा पासपोर्ट रद्द करण्यात येईल, असे पुणे पोलिसांनी नुकतंच सांगितलं होतं. यानुसार पोलिसांनी पासपोर्ट विभागाला अहवाल दिला होता. या अहवालाच्या आधारे गुरुवारी निलेशचा पासपोर्ट रद्द करण्यात आला. पासपोर्ट रद्द झाल्याने आता निलेशच्या अडचणी वाढल्या असून भारतात परतण्याशिवाय त्याच्याकडे पर्याय नाही.

निलेश घायवळने पासपोर्ट कुठून काढला होता?

निलेश घायवळने 2019 मध्ये अहिल्यानगर पोलिसांकडून पासपोर्ट काढल्याचे समोर आले होते. राहत्या घराचा पत्ता आणि इतर कागदपत्रे देऊन त्याने हा पासपोर्ट मिळवला होता. घायवळऐवजी गायवळ असे आडनाव त्याने लिहिले होते. आडनावातील या हेराफेरीमुळेच पोलिसांच्या प्रणालीतून तो निसटला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. याप्रकरणी अहिल्यानगरच्या दोन पोलिसांना चौकशीसाठी नोटीसही बजावण्यात आली होती.

Nilesh Ghaiwal Passport
Pune Crime: ब्युटी पार्लरमध्ये कामाच्या आमिषाने तरुणींकडून वेश्याव्यवसाय, पीडितांनी नियंत्रण कक्षाला फोन केल्याने सुटका

कोण आहे निलेश घायवळ?

निलेश हा मूळचा जामखेड तालुक्यातील सोनेगावचा असून त्याचे आईवडील हे कामानिमित्त पुण्यात स्थायिक झाले होते. एका बड्या खासगी कंपनीत निलेश नोकरीला होता. उच्चशिक्षित गुंड अशी त्याची ओळख असून पुणे, पुणे ग्रामीण अशा विविध भागात त्याच्यावर हत्या, खंडणी, हत्येचा प्रयत्न असे डझनभरापेक्षा जास्त गंभीर गुन्हे दाखल आहेत. गेल्या दोन दशकापासून त्याने पुण्यातील गुन्हेगारी क्षेत्रात स्वत:ची दहशत निर्माण केली आहे. राजकीन नेत्यांचाही त्याच्यावर वरदहस्त असल्याचा आरोप वारंवार केला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news