

[web_stories title="true" excerpt="false" author="false" date="false" archive_link="true" archive_link_label="" circle_size="150" sharp_corners="false" image_alignment="left" number_of_columns="1" number_of_stories="10" order="DESC" orderby="post_date" view="circles" /]
पुणे, पुढारी वृत्तसेवा: पुर्वीच्या भांडणाच्या रागातून टोळक्याने तरुणाला बेदम मारहाण करीत गंभीररित्या जखमी केले. ही घटना 12 एप्रिलला वडकीतील फिल्ड गार्ड कंपनीसमोर घडली. या प्रकरणी चौघांविरुद्ध लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रणव संतोष निगडे आणि इतर तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्ञानेश म्हेत्रे (वय 20 रा. दिवे, पुरंदर) असे जखमीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रणव आणि ज्ञानेश यांचे काही दिवसांपुर्वी भांडण झाले होते. त्याच रागातून प्रणवने साथीदारांना बोलावून घेतले. कंपनीत कामावरुन सुटल्यानंतर घरी जाण्याच्या तयारीत असताना टोळक्याने ज्ञानेशला बेदम मारहाण करीत जखमी केले. उपचारानंतर ज्ञानेशने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलीस उपनिरीक्षक तरटे तपास करीत आहेत.
[web_stories title="true" excerpt="true" author="false" date="true" archive_link="true" archive_link_label="" circle_size="150" sharp_corners="false" image_alignment="left" number_of_columns="1" number_of_stories="5" order="DESC" orderby="post_date" view="list" /]