Ganesh festival Prize Distribution: बाप्पाचा जयघोष अन् एकाच जल्लोष; पारितोषिक वितरण समारंभ थाटात

‌‘नटरंग ॲकॅडमी‌’च्या कलाकारांनी कला सादरीकरणाने जिंकली मने...
Ganesh festival Prize Distribution
बाप्पाचा जयघोष अन् एकाच जल्लोष; पारितोषिक वितरण समारंभ थाटातPudhari
Published on
Updated on

पुणे: लाडक्या गणरायाच्या कव्वाली, हिंदी व मराठी गाण्यांत मंत्रमुग्ध झालेले गणेशभक्त, ‌‘गणपत्ती बाप्पा मोरया‌’चा जयघोष अन्‌‍ करंडक कुणाला मिळणार? या प्रश्नाची हुरहूर आणि काळजाची धडधड वाढली असतानाच पारितोषिकविजेत्या मंडळाचे नाव उच्चारताच विजेत्या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला, अशा उत्साही वातावरणात गणाधीश नवोन्मेष स्पर्धा 2025चा पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम पार पडला.

कार्यक्रमासाठी सायंकाळपासूनच मंडळांचे कार्यकर्ते भगवी टोपी, फेटे तसेच ओळखपत्र घालून कार्यक्रमस्थळी दाखल होत होते. या वेळी बहुतांश मंडळांचे कार्यकर्ते कुटुंबीयांसह सहभागी झाले होते. कार्यक्रमात सहभागी झाल्याचा आनंद चिमुकल्यांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांच्याच चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता. पारितोषिक वितरणासाठी मोठ्या संख्येने गणेशभक्त उपस्थित राहिल्याने परिसरात कार्यकर्त्यांचा जनसागर उसळल्याचे चित्र दिसून आले.  (Latest Pune News)

Ganesh festival Prize Distribution
Sunday Shopping: रविवार ठरला खरेदीचा ‌‘सुपर संडे‌’; बाजारपेठेत मोठी गर्दी

‌‘नटरंग ॲकॅडमी‌’च्या कलाकारांनी कला सादरीकरणाने जिंकली मने...

पारितोषिक वितरण कार्यक्रमात ‌‘नटरंग ॲकॅडमी‌’च्या कलाकारांनी संगीत अन्‌‍ नृत्याचा मिलाफ असलेला बहारदार कार्यक्रम सादर केला. राजेश गवळी, विनायक पोवार आणि शीतल जाधव यांनी गीते सादर केली; तर रोहित जाधव, पवन अवचरे आणि विशाल जाधव यांनी संगीतात साथ केली. ॲकॅडमीचे जतिन पांडे यांनी निवेदन केले. स्वाती धोकटे यांनी लावणी, तर वैष्णवी गोकुळे, श्रुती पासलकर, पावनी पवार, जान्हवी शिंदे, पूर्वा भागवत, गणेश कांबळे यांनी भरतनाट्यम नृत्य सादर करीत दाद मिळवली. प्रणव कडेकर यांनी नृत्यदिग्दर्शन केले.

परीक्षकांचा सन्मान

गणाधीश नवोन्मेष स्पर्धेचे परीक्षण दत्तात्रय वेताळ, राजेंद्र करंदीकर, माणिक ओसवाल, मनीषा निंबाळकर, भरत सुरसे, स्मिता खोले, अनिल खोले, विनायक सोनावणे आणि अनंत लक्ष्मी कैलासन यांनी केले. परीक्षकांचा कार्यक्रमात सन्मान करण्यात आला.

Ganesh festival Prize Distribution
Pune Traffic Change: दुर्गेात्सवामुळे शहरातील वाहतुकीत बदल; 'या' भागातील रस्ते वाहतुकीस बंद

...अन्‌‍ ते म्हणाले, ‌‘थँक्यू पुढारी‌’

गणेशोत्सवादरम्यान अनेक मंडळांनी उत्सवाचे सकारात्मक आणि समाजहितकारी रूप अधोरेखित करणारे देखावे, मिरवणूक, तसेच विविध सामाजिक उपक्रम राबविले. अशा मंडळांच्या कामांची दखल ‌‘दै. पुढारी आयोजित गणाधीश नवोन्मेष स्पर्धा 2025‌’ च्या माध्यमातून विविध पारितोषिके देऊन घेतली.

या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ नुकताच पार पडला, त्यावेळी अनेक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त करत आपल्या कामाची दखल घेतल्याबद्दल आभारही व्यक्त केले. त्यातील काही निवडक पदाधिकाऱ्यांच्या या प्रतिक्रिया...

पुणे शहरात साजऱ्या होणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सवाची जगाच्या पातळीवर एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. उत्सवाच्या माध्यमातून समाज प्रबोधन आणि सामाजिक कामही अनेक गणेश मंडळे दरवर्षी करत असतात. अशा विधायक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करणाऱ्या गणेश मंडळाना प्रोत्साहन मिळावे यासाठी

‌‘दै. पुढारी‌’च्या माध्यमातून घेण्यात आलेल्या ‌‘गणाधीश नवोन्मेष स्पर्धे‌’त मोठ्या संख्येने गणेश मंडळे सहभागी झाली. या सर्व मंडळानी सामाजिक उपक्रम राबवत यावर्षीचा गणेशोत्सव साजरा केला. त्या सर्वांचा मी आभारी आहे. ज्या मंडळांना या स्पर्धेत बक्षिसे मिळाली, त्यांचेही मनापासून अभिनंदन. पुनीत बालन ग््रुापच्या माध्यमातून विधायक पद्धतीने गणेशोत्सव साजऱ्या करणाऱ्या मंडळांना कायम सहकार्य राहील.

- पुनीत बालन, अध्यक्ष, पुनीत बालन ग्रुप

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news