कात्रजची ’फुलराणी’ सजली ! आठवा वाढदिवस साजरा

कात्रजची ’फुलराणी’ सजली ! आठवा वाढदिवस साजरा
Published on
Updated on

कात्रज; पुढारी वृत्तसेवा : नानासाहेब पेशवे तलावाच्या पर्यटनात भर टाकणार्‍या आणि आबालवृद्धांच्या लाडक्या फुलराणीचा आठवा वाढदिवस शुक्रवारी उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त फुलराणीची रंगीबेरंगी फुले आणि फुग्यांनी आकर्षक सजावट करण्यात आली होती. माजी नगरसेवक वसंत मोरे यांच्या हस्ते केक कापून फुलराणीचा वाढदिवस साजरा करण्यात आला. बालकांसह परिसरातील नागरिक या वेळी उपस्थित होते.

पेशवे तलावातील कृत्रिम बेटावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवरायांचा पुतळा, पर्यावरणरहित जॉगिंग ट्रॅक, उंच तिरंगा ध्वज, पाटीलवाडा यासह फुलराणी प्रकल्पाची सुरुवात 2 मे 2015 साली करण्यात आली. यामुळे कात्रजच्या पर्यटनात मानाचा तुरा रोवला. मात्र, कालांतराने महापालिका प्रशासनाचे फुलराणीकडे दुर्लक्ष झाल्याने हा प्रकल्प पाच वर्षे बंद होता.

मोरे यांनी पाठपुरावा केल्याने गेल्या 26 जानेवारीपासून फुलराणी पुन्हा सुरू झाली. पर्यटकांच्या आनंदात भर टाकत अवघ्या तीन महिन्यांत फुलराणीने महापालिकेला एक लाख 70 हजार रुपयांचे उत्पन्न मिळवून दिले आहे. त्यामुळे पर्यटनाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना आनंद देण्याबरोबरच उत्पन्न मिळवून देणार्‍या या प्रकल्पाकडे महापालिका प्रशासनाने विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचे या वेळी मोरे यांनी सांगितले. मंगेश रासकर, उद्यान निरीक्षक ताम्हाणे आदींसह कर्मचारी या वेळी उपस्थित होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news