FTII Students Protest: कोलकात्यातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पुण्यातून पाठिंबा; एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन

एसआरएफटीआयमधील सहा विद्यार्थ्यांचे निलंबन मागे घेण्याची मागणी; शैक्षणिक संस्थांमधील हस्तक्षेपाविरोधात निदर्शने
FTII Students Protest
FTII Students ProtestPudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: कोलकाता येथील सत्यजित रे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट (एसआरएफटीआय) मधील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या (एफटीआयआय) विद्यार्थ्यांनी मंगळवारी (दि. २७) देशव्यापी आंदोलनात सहभाग घेतला.

FTII Students Protest
Private Bus Fare: दिवाळीत खासगी बसने जादा भाडे आकारल्यास सावधान! आरटीओचा कारवाईचा इशारा; तक्रारीसाठी व्हॉट्सॲप क्रमांक जारी

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित संघटनांकडून शैक्षणिक संस्थांमध्ये हस्तक्षेप आणि संस्थांच्या 'भगवेकरणा'चा प्रयत्न होत असल्याचा आरोप करीत एसआरएफटीआयच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन पुकारले आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी सकाळी १०.३० वाजता आंदोलन करण्यात आल्याचे एफटीआयआयच्या विद्यार्थी संघटनेने सांगितले. एसआरएफटीआय मधील सहा विद्यार्थ्यांचे निलंबन मागे घेण्याची मागणीही संघटनेने केली.

FTII Students Protest
Giant Radio Galaxy: पुण्यातील शास्त्रज्ञांचा मोठा शोध! ४२ लाख प्रकाशवर्षे विस्ताराच्या महाकाय रेडिओ दीर्घिकेचा उलगडा

एसआरएफटीआयमधील विद्यार्थ्यांवर दि. २७ सप्टेंबर रोजी हिंसाचार झाल्याचा आरोप एफटीआयआयच्या विद्यार्थी संघटनेने केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, विद्यार्थ्यांची संमती नसताना परिसरात आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम थांबविण्यास सांगितल्यानंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी (एबीव्हीपी) आणि अखिल भारतीय ग्राहक पंचायत (एबीजीपी) संबंधित सदस्यांनी विद्यार्थ्यांवर हल्ला केला.

FTII Students Protest
Arnab Cyclone: ‘अर्णब’ चक्रीवादळाचा महाराष्ट्राला फटका; विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा, गडचिरोलीला ऑरेंज अलर्ट

या घटनेच्या निषेधार्थ एसआरएफटीआयच्या विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या लढ्याला एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांनी पाठिंबा दिला आहे. एसआरएफटीआय प्रशासनाने सहा विद्यार्थ्यांना बजावलेल्या निलंबनाच्या नोटिसा मागे घ्याव्यात तसेच विद्यार्थ्यांना वसतिगृह आणि संस्थेच्या परिसरातून बाहेर काढण्याचे प्रयत्न थांबवावेत, अशा मागण्या आंदोलनाच्या केंद्रस्थानी आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news