पुणे : ‘पंतप्रधान आवास’मधून आता सामाईक जागेवरही बांधकाम

पुणे : ‘पंतप्रधान आवास’मधून आता सामाईक जागेवरही बांधकाम
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा : जागेची समस्या शहरी भागात मोठ्या प्रमाणात जाणवत असल्याने प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांसाठी शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. जागा सामाईक असल्यास अशा पात्र लाभार्थ्यांना आवास योजनेचा लाभ घेणे शक्य व्हावे, यासाठी त्यांना सामाईक जागेवर बहुमजली इमारत बांधण्यास राज्य शासनाने परवानगी दिली आहे.

एकाच कुटुंबातील परंतु सामाईक जागा असलेल्या लाभार्थ्यांना केंद्र शासनाच्या धोरणानुसार प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत शहरी भागात बहुमजली इमारत बांधण्यास शासनाने परवानगी दिली आहे, याबाबतचे आदेश गृहनिर्माण विभागाचे कार्यासन अधिकारी राजू अंबाडेकर यांनी काढले आहेत.

2019 मध्ये शासनाने सुधारणा केली असून त्यानुसार प्रधानमंत्री आवास योजनाअंतर्गत पात्र कुटुंबातील सज्ञान कमावती व्यक्ती ही या योजनेसाठी पात्र ठरविण्यात आली आहे. अशा परिस्थितीत एकत्र कुटुंब पध्दतीमुळे कुटुंबप्रमुखांच्या नावावरच संपूर्ण जागा असल्याने कुटुंबातील इतर पात्र लाभार्थ्यांना नावावर जागा नसल्यामुळे प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घेता येत नसल्याचे निदर्शनास आले आहे. योजनेत लाभार्थ्यांना स्वत:च्या मालकीच्या जागेवर घरकुल बांधण्यासाठी अनुदान दिले जाते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news