

पुणे : दुभंगलेले ओठ आणि दुभंगलेले टाळू असणार्या मुलांवर खासगी रुग्णालयात मोफत शस्त्रक्रिया केल्या जात आहेत.
जर्मनीतील स्ट्रॅसबर्ग ऑस्टिओसिंथेसिस रिसर्च ग्रूप (एसओआरजी) समूहाची डॉक्टरांची टीम सध्या भारतभेटीवर असून, त्यांनी नुकतीच वाकड येथील नव्याने सुरू झालेल्या साईश्री विटालाईफ हॉस्पिटलला भेट दिली. याआधीच्या दोन भेटी या औंधमधील साईश्री युनिटला दिल्या होत्या.
प्राथमिक क्लेफ्ट लिप आणि पॅलेटच्या शस्त्रक्रिया या मोफत केल्या जाणार आहेत व नंतरच्या टप्प्यातील शस्त्रक्रियांच्या बाबतीत रिजिड एक्स्टर्नल डिव्हाईसेस डिस्ट्रॅक्टर्ससारख्या उपकरणांच्या खर्चाची जबाबदारी हॉस्पिटल उचलणार आहे, अशी माहिती डॉ. नीरज आडकर यांनी दिली. यावेळी प्रा. डॉ. पी. ए. डब्ल्यू. एच. केसलर, डॉ. सरूची अग्रवाल, डॉ. पुष्कर वाकनीस हे मान्यवर उपस्थित होते.