

पिंपरी : स्वस्तात प्लॉट देण्याच्या बहण्याने दोघांनी मिळून एकाची सहा लाख रुपयांची फसवणूक केली. ही घटना फेब—ुवारी 2011 ते ऑक्टोबर 2022 दरम्यान माळीनगर, देहूगाव येथे घडली.याप्रकरणी रघुनाथ भिकोबा कुंभार (65, रा. अभंगनगरी सोसायटी, देहूगाव) यांनी शुक्रवारी (दि. 21) देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अनिल जनार्दन सरोदे (रा. पंचशीलनगर, धनकवडी), भारत नरहरी पवार (रा. इंदिरानगर, धनकवडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगनमत करून फिर्यादी यांना स्वस्तात प्लॉट देण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी त्यांच्याकडून सहा लाख रुपये घेतले. त्यानंतर प्लॉट न देता फसवणूक केली. दरम्यान, फिर्यादी यांनी प्लॉट आणि पैशाबाबत विचारणा केली असता आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या पत्नीला शिवीगाळ करीत जिवे मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत नमूद आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक दळवी करीत आहेत.