लोणी-धामणी : परदेशी पाहुण्यांना पडली धामणीची भुरळ; गावकर्‍यांच्या कामाची केली स्तुती

लोणी-धामणी : परदेशी पाहुण्यांना पडली धामणीची भुरळ; गावकर्‍यांच्या कामाची केली स्तुती

लोणी-धामणी; पुढारी वृत्तसेवा : आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागातील मोठ्या आणि आदर्श असणार्‍या धामणी गावाला परदेशी अभ्यासकांनी भेट दिली. घोड नदी खोर्‍यातील पाणी प्रश्नाचा अभ्यास करणे, या उद्देशाने 'द नेचर काँझरवंशी' (ढहश छर्रीीींश उेपीर्शीींरपीहळ) या कंपनीच्या कमिटीने धामणी (ता. आंबेगाव) गावाला भेट देऊन गावातील शेतीचा पाणी प्रश्न, रोजगार, भौगोलिक, ऐतिहासिक, शैक्षणिक आणि आरोग्याची माहिती घेतली.

'द नेचर काँझरवंशी' या कंपनीचे जगातील 70 देशांत काम चालते. विविध देशांतील पाणी प्रश्नावर अभ्यास करून सरकारला माहिती देऊन दुष्काळी परिस्थितीवर मात करायचा प्रयत्न कंपनीकडून केला जात आहे. पंचायत समिती सदस्य रवींद्र करंजखेले यांचे बंधू राहुल करंजखेले यांच्या माध्यमातून ही कमिटी धामणी गावात आली होती. या कमिटीमध्ये भारत, अमेरिका, कोलंबिया या देशांतील प्रतिनिधींचा समावेश होता.

धामणी गावामधील गावठाणाची त्यांनी पाहणी केली. गावची दोन्ही बाजूची दुकाने, घरे पाहून परदेशी पाहुणे खूष झाले. विशेषत: जुने अत्यंत खोल असणारे आड पाहून त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. पुरातन राम मंदिराला भेट देऊन त्यांनी दर्शन घेतले. ग्रामपंचायतीला भेट देऊन गावची सर्व माहिती घेतली. पोस्ट कार्यालय, जय हिंद वाचनालयची त्यांनी माहिती घेतली.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या भेटीच्या वेळी त्यांनी शाळेचे फोटो काढले. स्वप्निल तांबे यांच्या हॉटेलमधील कॉफी, भेळ, शेव-रेवडी, वडापाव, जिलबीवर ताव मारताना हे सर्व पदार्थ आम्हाला खूप आवडले, असे परदेशी पाहुण्यांनी आवर्जून सांगितले. संपूर्ण गाव फिरून झाल्यावर शेवटी त्यांनी शाळेजवळच्या ओढ्यावरील बंधार्‍याला भेट दिली व त्यातील पाणीपातळीची पाहणी केली.

शेवटी जाताना परदेशी पाहुण्यांनी गाव आणि गावकरी खूप चांगले आहेत. आम्हाला तुमचे गाव खूप खूप आवडले, आम्ही पुन्हा नक्की येणार, असे सांगत तुम्ही सर्व असेच एकत्र काम करा, असा सल्ला दिला. या कमिटीमध्ये भारतातील गिरिजा गोडबोले, सीताराम शरणांगत, गार्गी जोशी, ज्ञानेश गानोरे, अमेरिकेचे ब—ुक अ‍ॅटवेल, न्यॉथन कॅरीज व कोलंबियाचे जॉन गोंझालीज होते. या पाहणी दौर्‍यात सरपंच रेश्माताई बोर्‍हाडे, माजी सरपंच सागर जाधव, उपसरपंच संतोष करंजखेले, ग्रामपंचायत सदस्य अक्षयराजे विधाटे, राहुल करंजखेले, अजित बोर्‍हाडे, अध्यक्ष संतोष पंचरास, पोस्टमन सुधाकर जाधव, सतीश पंचरास, अरुणा पंचरास, दिनेश जाधव उपस्थित होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news