Rising Temperature Forecast: पुढील काही दिवसात राज्यात आणि देशात तापमान वाढेल

पश्चिमी चक्रवातांमुळे हिमालयात पाऊस-हिमवृष्टीचा अंदाज; महाराष्ट्रात कमाल-किमान तापमान वाढेल
Temperature
TemperaturePudhari
Published on
Updated on

पुणे: राज्यासह देशात पुढील काही दिवसांत बहुतांश भागात कमाल तसेच किमान तापमान वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

Temperature
Pune Municipal School Condition: महापालिका शाळांची दयनीय अवस्था; पाणी-स्वच्छतागृहांचा गंभीर प्रश्न

सध्या हिमालयात लागोपाठ दोन पश्चिमी चक्रावात धडकणार आहेत. त्याच्या प्रभावामुळे हिमालयाच्या कुशीतील राज्यात बर्फवृष्टी व पाऊस पडण्याचा अंदाज आहे. दुसरीकडे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार आहे. यामुळे दक्षिण भारतातील काही ठिकाणी पाऊस पडू शकतो. दरम्यान, 19 फेबुवारीपर्यंत पूर्व किनारपट्टी, मध्य भारत, दक्षिण भारतात किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहणार आहे.

Temperature
Pune Property Tax Gun Threat: पुणे महापालिकेत करदुरुस्तीवरून पिस्तूलधारी धमकी; मोठा अनर्थ टळला

त्यानंतर 20 ते 26 फेबुवारीच्या शेवटच्या आठवड्यात मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, ओरिसा, विदर्भ, तेलंगणा, उत्तर कर्नाटकात किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहू शकते. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक किनारपट्टी तसेच उत्तर महाराष्ट्र व मध्य महाराष्ट्रातील किमान तसेच कमाल तापमान पुढील काही दिवसांत वाढणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news