Pune Municipal School Condition: महापालिका शाळांची दयनीय अवस्था; पाणी-स्वच्छतागृहांचा गंभीर प्रश्न

नगरसेविकांचा सभेत थेट सवाल; निवृत्त शिक्षकांच्या रखडलेल्या पेन्शनचाही मुद्दा ऐरणीवर
Municipal School
Municipal SchoolPudhari
Published on
Updated on

पुणे: विद्येच्या माहेरघरात महापालिका शाळांची मोठी दुरवस्था झाली आहे. शाळांच्या इमारती मोडकळीस आल्या आहेत. मुलांना प्यायला पाणी नाही, तर स्वच्छतागृहांची देखील दुरवस्था झाली झाली आहे, असे म्हणत भाजपच्या नगरसेविका वर्षा तापकीर यांनी महापौरांकडे तक्रार केली. तसेच अर्चना पाटील यांनी देखील अनेक निवृत्त शिक्षकांच्या पेन्शन रखडलेले आहेत, त्यासाठी त्यांना महापालिकेत खेपा घालाव्या लागत असल्याची समस्या मांडली.

Municipal School
Pune Property Tax Gun Threat: पुणे महापालिकेत करदुरुस्तीवरून पिस्तूलधारी धमकी; मोठा अनर्थ टळला

महापालिकेची सर्वसाधारण सभा शुक्रवारी पार पडली. सभा सुरू होण्यापूर्वी काही नगरसेविकांनी शहरातील प्रश्न मांडले. भाजपच्या नगरसेविका वर्षा तापकीर म्हणाल्या, अनेक शाळांचे दरवाजे तुटलेले आहेत. शाळांची परिस्थिती वाईट आहे. निधी मिळत नसल्याने दुरुस्तीची कामे करता येत नाही. विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची व स्वच्छता गृहांची देखील सोय नाही. त्यामुळे येत्या काळात शाळांच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

Municipal School
Shirur Election Drug Abuse: शिरूर तालुक्यात निवडणुकांच्या आड ड्रग्जचा फैलाव?

यावर महापौर मंजूषा नागपुरे यांनी आयुक्तांना शाळांना प्रधान्याने निधी उपलब्ध करून द्याव्या, असे सांगितले. यावर आयुक्तांनी देखील हा प्रकार गंभीर असल्याचे सांगत याची दखल घेत शाळांच्या दुरुस्तीवर भर दिला जाईल, असे सांगितले.

Municipal School
Belsar Group Election Result: बेलसर गटात भाजपचे वर्चस्व; अंतर्गत कलहामुळे राष्ट्रवादीला फटका

सभेची गरिमा राखण्यासाठी नव्या सभासदांना प्रशिक्षण द्या

महापालिकेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत महापौर सभागृहात असताना देखील त्यांना नमस्कार न करता कुणीही उठून जात होते, तर अनेक नगरसेवक रील्सस्टार घेऊन आले होते. शुक्रवारी झालेल्या सभेत देखील अनेक जण बोलत होते. सभागृहातून उठून जाताना महापौर यांना नमस्कार करून जाणे गरजेचे असताना तसे कुणी करत नव्हते. यावर नगरसेवक प्रशांत जगताप यांनी नाराजी व्यक्त करत सभागृहाला शिस्त लावण्याची मागणी केली.

Municipal School
PMPML Electric Bus Fire: चाकणमध्ये पीएमपीएमएलची इलेक्ट्रिक बस पेटली; 50 प्रवाशांचे प्राण वाचले

अनेक सदस्य सभागृहात मोबाईलवर बोलत येतात, गॉगल लावून येतात, तसेच महापौरांना नमस्कार करत नाहीत. यामुळे नव्या सदस्यांना संभागृहातील नियमांची माहिती देण्यासाठी प्रशिक्षण देण्याची मागणी त्यांनी केली. यावर सभागृह नेते गणेश बिडकर यांनी सभागृहाची गरिमा ही पाळली जावी, असे म्हणत आम्ही कार्यशाळा घेऊन नव्या नगरसेविकांना प्रशिक्षण देणार आयोग सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news