जुना मुंबई- पुणे रस्ता रुंदीकरणासाठी 67 कोटी खर्च

जुना मुंबई- पुणे रस्ता रुंदीकरणासाठी 67 कोटी खर्च

पुणे; पुढारी वृत्तसेवा: जुन्या मुंबई- पुणे महामार्गासाठी लष्कराकडून जागा ताब्यात आल्यानंतर या कामासाठी निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. आठ कंपन्यांनी निविदा भरल्या आहेत. या 2.1 किलोमीटर रस्त्याच्या कामासाठी तब्बल 87 कोटी रुपये खर्च येणार आहे. यंदाच्या अंदाजपत्रकात 20 कोटी रुपये तरतूद उपलब्ध असून, पुढील दोन वर्षाच्या अंदाजपत्रकात 67 कोटीची तरतूद करण्यास शुक्रवारी स्थायी समितीने मान्यता दिली.

बोपोडी येथील हॅरीस बि—जपासून खडकी रेंजहिल्स चौकापर्यंतच्या रस्ता रुंदीकरणासाठी महापालिकेने 2016 मध्ये निविदा प्रक्रिया राबविली होती. या रस्त्याच्याकडेला बोपोडी येथे राहाणार्‍या नागरिकांचे पुनर्वसन करण्यात आले. परंतू खडकी रेल्वे स्टेशनपासून रेंजहिल्स चौकापर्यंत रस्त्याच्या कडेची जागा संरक्षण विभागाकडून मिळत नव्हती. त्यामुळे रस्ता रुंदीकरण रखडले होते. खडकी रेल्वे स्टेशनमुळे रस्त्याच्या विरूद्ध दिशेच्या जागेशिवाय रुंदीकरणासाठी पर्याय नव्हता. स्वारगेट- पिंपरी चिंचवड मेट्रो मार्गही याच रस्त्यावरून जाणार असल्याने भूसंपादनाअभावी हे काम रखडले होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news