खेड शिवापूर: शिवगंगा खोऱ्यातील फूल उत्पादक शेतकरी सध्या आर्थिक अडचणीत आहेत. घटस्थापना आणि दसरा सणाच्या तोंडावर, फुलांचे बाजारभाव कोसळल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.
यावर्षी जास्त पाऊस असूनही अनेक शेतकऱ्यांनी कष्टाने फुले पिकवली आहेत. मात्र सध्या बाजारभाव अत्यंत कमी आहेत. गणपती उत्सवात पाचव्या दिवसापासून झेंडू 5 ते 10 रुपये किलो, शेवंती 20 ते 25 रुपये, बिजली 10 ते 15 रुपये, अस्टर 15 ते 20 रुपये, गुलाबाची गड्डी 5 ते 10 रुपयांत मिळत आहे. परिणामी शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. (Latest Pune News)
गणेशोत्सवात मुंबईतील दादर फूल मार्केट आरक्षणाच्या आंदोलनामुळे बंद राहिल्याने, इतर बाजार समित्यांमध्ये फुलांची आवक वाढली. परिणामी सर्व पिकांच्या बाजारभावावर परिणाम झाला. मोठ्या कष्टाने पिकविलेल्या फुलांना बाजार नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
ममहाराष्ट्र शासनाने कृत्रिम फुलांवर बंदी जाहीर केली, पण अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे गणपती उत्सवात व सध्या फुलांचे बाजारभाव कोसळले आहेत; हा निर्णय फक्त कागदावर राहिला आहे,फ असे नवविकास युवक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष दादासाहेब पवार यांनी सांगितले.