कोकणाला पुरस्थितीचा इशारा

मुसळधार पावसाने राज्याच जोर पकडला
Rain Update in Maharashtra
आगामी दिवसात राज्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यताFile Photo
Published on
Updated on

पुणे, पुढारी वृत्तसेवा : केरळ ते कोकण किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे कोकण अन् घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढला असून आगामी 24 ते 48 तास कोकण किनारपट्टीला पूरस्थितीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.गेल्या चोवीस तासांत माथेरानमध्ये 220 मिलिमीटर पाऊस झाल्याने हंगामातील सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. विदर्भात सर्वदूर पावसाने हजेरी लावली. मात्र, मध्य महाराष्ट्र अन् मराठवाड्यात पावसाचा जोर कमी आहे.

Summary
  • घाटमाथ्यावरही वाढला पावसाचा जोर

  • माथेरानमध्ये 220 मिलिमीटर पाऊस : विदर्भातही सर्वदूर मध्यम सरी

  • मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात रिमझिम

समुद्रसपाटीवरील कमी दाबाचा पट्टा दक्षिण गुजरात ते उत्तर केरळ किनारपट्टीपर्यंत आहे. त्यामुळे गेल्या 24 तासांंत कोकणात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी झाली. त्यात माथेरानमध्ये 220 मि.मी. तर रत्नागिरी, राजापूर, पनवेल, फोंडा, कर्जतमध्ये 150 ते 120 मि.मी. पाऊस झाला आहे. घाटमाथ्यावर गगनबावडा 179, तर लोणावळामध्ये 131 मि.मी. पावसाची नोंद गेल्या 24 तासांत झाली. मात्र, उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी मुसळधार, तर बहुतांश भागात हलका ते मध्यम पाऊस झाला. सोमवारी 8 जुलै रोजीही कोकण, घाटमाथा आणि विदर्भात अतिवृष्टीचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

Rain Update in Maharashtra
मुसळधार पावसाने रायगड मार्गावरील वाहतूक दुसऱ्यांदा विस्कळीत!

कोकणला आगामी 48 तास पूरस्थितीचा इशारा...

कोकणातील बहुतांश भागात सोमवार व मंगळवारी पूरस्थिती उद्भवू शकते असा इशारा रविवारी रात्री उशिरा हवामान विभागाने दिला आहे कर्नाटक ते गुजरात किनारपट्टी पर्यंत कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून या संपूर्ण किगारपट्टीला आगामी 48 तास रेड देण्यात आला आहे दक्षिण भारतात अतिवृष्टी सुरू झाली असून ती गोवा किनारपट्टी पर्यंत सुरू आहे गेल्या 24 तासापासून अतिवृष्टी सुरू आहे रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व धरणे भरत आली असल्याने येथील पाणी पातळी पुरी रेषेच्याही वर गेल्याने हा इशारा हवा विभागाने दिला आहे त्यामुळे आगामी 24 तास सत्तर प्राण्यांचे आदेश हवामान विभागाने दिले आहेत.

Rain Update in Maharashtra
वर्ध्यात वीजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस

राज्यात रविवारी झालेला पाऊस (मिलीमीटरमध्ये)

कोकण : माथेरान 220, रत्नागिरी 146, राजापूर 135, पनवेल 121, फोंडा 120, कर्जत 115, मुरबाड 115, लांजा 170, खालापूर 106, मंडणगड 105, संगमेश्वर देवरुख 102, आवळेगाव 91, शाहापूर 90, रोहा 82, पाली 81, पेण 80, सांगे 78, दोडामार्ग 73, दापोली 72, मुरूड 70, गुहागर 67, माणगाव 66, केपे 65, वैभववाडी 65, कुलाबा 61, पोलादपूर 59, कणकवली 59, जव्हार 57, हर्णे 54, मोखेडा 54, म्हसळा 53, सावर्डे 53, सावंतवाडी 45, मध्य महाराष्ट्र : गगनबावडा 179, लोणावळा 131, चांदगड 95,यावल 93, ओझरखेडा 69, पेठ 67, सुरगाणा 60, राधानगरी 58, महाबळेश्वर 56, त्र्यंबकेश्वर 52, हर्सुल 52, आजरा 50, इगतपुरी 47, वणी 41, शाहूवाडी 40, कोकरूड, मराठवाडा : किनवट 55, नायेगाव खैरगाव 42, मुदखेड 37, पाटोदा 29, लोहा 27, विदर्भ : तिरोडा 107, मुलचेरा 85, राजुरा 76, कोरफणा 76, बल्लारपूर 74, मारेगाव 61, चामोशी 59, देसाईगंज 57, तुमसर 56, गोंडवनपुरी 52, पांढरीकवडा, ब्रह्मपुरी 51, वरोरा, नागभीड 47, चंद्रपूर 47, वाणी, देवळी 46, झरीझमनी 44, चिमूर 44, मोरगाव 43, हिंगणघाट 36, एटापल्ली 35, भिवापूर 29, घाटमाथा : अंबोणे 148, भिवपुरी : 145, लोणावळा 129, शिरगाव : 124, ताम्हिणी 130, खांद 138, वळवण : 118, दावडी : 117, कोयना 107, लोणावळा 99, डुंगरवाडी 99, शिरोटा 96, वाणगाव 91, भिरा 94, धारावी 100, ठाकूरवाडी 85, कोयना 98, खोपोली 60.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news