मुलांनी नेहमी मोबाईल किंवा टीव्ही बघण्यापेक्षा विविध कौशल्य आत्मसात केली पाहिजेत. यासाठी आम्ही आमच्या दोन्ही मुलांना प्रोत्साहन देत असतो. दिव्यांकची स्मरणशक्ती लहानपणापासून चांगली आहे. त्याला कोणतीही गोष्ट सांगितली तरी ती त्याला लक्षात राहत असे.
– राहुल जगताप, दिव्यांकचे वडील
दिव्यांकला नेहमी बुद्धीला चालना देणारे खेळ खेळायला आवडतात. म्हणून मीदेखील त्याला ते खेळ खेळण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे. नुकताच माझ्या मुलीनेदेखील 'बायनरी कोड' ओळखण्याचा इंडिया बुकमध्ये विक्रम केला आहे. मुलांना योग्य मार्गदर्शन दिले तर त्यांना योग्य दिशा मिळते.
– राधिका जगताप, दिव्यांकची आई