पुणे : चार घरफोड्यांत साडेपाच लाखांचा ऐवज चोरीला

पुणे : चार घरफोड्यांत साडेपाच लाखांचा ऐवज चोरीला
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा : शहरात कात्रज, लोहगाव, कोंढवा बुद्रुक आणि कोंढवा खुर्द अशा चार ठिकाणी चोरट्यांनी घरफोड्या करून 5 लाख 58 हजारांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी स्थानिक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या सुनंदन पार्क येथील, कात्रज-कोंढवा रोडवरील शिवशंभोनगर येथे तसेच कात्रज येथील संतोषनगरमधील सदनिका फोडून चोरट्यांनी तब्बल 3 लाख हजारांचा ऐवज चोरून नेला.

याप्रकरणी अज्ञात चोरट्यांवर जमीर नजरुद्दीन सय्यद यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 21 डिसेंबरच्या सकाळी सात ते दुपारी दीडच्या सुमारास या तीन सदनिका फोडण्यात आल्या. त्यानुसार भारती विद्यापीठ पोलिस पुढील तपास करीत आहेत.

विमानळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत लोहगाव येथील सुयश मेडिकलच्या शटरचा दरवाजा उचकटून अज्ञात चोरट्यांनी गल्ल्यातील 7 हजार 500 रुपयांची रक्कम चोरून नेली. याप्रकरणी सुनील कृष्णा सोनवणे (वय 34, रा. कृष्णा शांताई निवास, पठारेवस्ती, लोहगाव, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार 9 डिसेंबरच्या पहाटे उघडकीस आला.

तिसब घटनेत कोंढवा बुद्रुक येथील शांती हाईट्स येथील सुभाष दिनशे शहाबादी (वय 54) यांची राहती सदनिका बंद करून लग्नासाठी त्यांच्या मूळगावी कुलबुर्गी येथे गेले असताना त्यांची सदनिका फोडून चोरट्यांनी 2 लाखांची रोकड चोरून नेली. हा प्रकार 22 डिसेंबरला सकाळी उघडकीस आला. त्यांनी याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

कोंढव्यात झालेल्या दुसर्‍या घरफोडीत चोरट्यांनी नासीर अब्दुलजब्बार शेख (वय 49, भाग्योदयनगर, कोंढवा खुर्द) यांच्या बाल्कनीतून घरामध्ये प्रवेश करून लोखंडी कपाटातील लॉकर उघडून सोन्याचे दागिने, रोख रक्कम, महत्त्वाची कागदपत्रे असा 47 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news