पुण्यात प्रथमच स्वॅप लिव्हर ट्रान्सप्लांट

पुण्यात प्रथमच स्वॅप लिव्हर ट्रान्सप्लांट

पुणे; पुढारी वृत्तसेवा : सह्याद्री हॉस्पिटल्सच्या ट्रान्सप्लांट टीमने पुण्यातील पहिले स्वॅप यकृत प्रत्यारोपण यशस्वीरीत्या केले. खराब झालेल्या यकृताने ग्रस्त असलेल्या दोन रुग्णांवर एकाच वेळी जीवरक्षक यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती यकृत आणि बहुअवयव प्रत्यारोपण विभागाचे प्रमुख डॉ. बिपिन विभूते यांनी पत्रकार परिषदेत दिली.

प्रत्येक दाता एकाच्या नात्यातला असला, तरी त्यांचे यकृत परस्परांशी जुळणारे नव्हते म्हणून द्वि-मार्गी प्रत्यारोपण करण्याचा निर्णय घेतला आणि त्याला दोन्ही कुटुंबांनी सहमती दर्शविली. 11 डॉक्टर आणि इतर कर्मचार्‍यांनी 20 तासांहून अधिक काळ हे अत्यंत कठीण शस्त्रक्रिया पूर्ण केली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news