ट्रम्प कंपनीची राज्यात 300 कोटींची गुंतवणूक; पुण्याला पहिली पसंती

ट्रम्प कंपनीची राज्यात 300 कोटींची गुंतवणूक; पुण्याला पहिली पसंती

Published on

पुणे; पुढारी वृत्तसेवा : राज्यात गुंतवणूक वाढीसोबत रोजगार निर्मितीसाठी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत सध्या जर्मनीच्या दौर्‍यावर असून, तेथील ट्रम्प कंपनी पुढील दोन वर्षांत महाराष्ट्रात सुमारे 300 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचे या वेळी स्पष्ट करण्यात आले. दौर्‍यात पहिल्या दिवशी सामंत यांनी स्टुटगार्ट येथील ट्रम्प कंपनीला भेट दिली. कंपनीचे पथक लवकरच पुण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ट्रम्प कंपनीचे सीईओ रिचर्ड बॅनम्युलर आणि ट्रम्प इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक संदीप पाटील यांनी सामंत यांचे स्वागत केले.

बॅनम्युलर यांनी कंपनीच्या अत्याधुनिक लेझर कटिंग मशिन्स आणि फोल्डिंग मशिन्सचे सादरीकरण केले. विजेवर चालणार्‍या वाहनांच्या ( एत) बॅटरी आणि बॅटरी स्टोरेज युनिट्स तयार करण्यासाठी ही मशिन वापरली जात आहेत. या मशिनसाठी ट्रम्प कंपनी महाराष्ट्रात निर्मिती प्रकल्प सुरू करण्यास उत्सुक आहे. कंपनीचे प्रतिनिधी पुढील महिन्यात महाराष्ट्राला भेट देऊन स्थळपाहणी करणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले.

लॅप केबल्स समूहाला भेट
सामंत यांनी या वेळी स्टुटगार्ट येथील लॅप केबल समूहाला भेट दिली. या वेळी बार्डनचे संचालक आणि भारताचे वाणिज्य दूत अँड्रियास लॅप यांनी त्यांचे स्वागत केले. या वेळी लॅप यांनी ईव्ही चार्जिंग केबल्समधील नवीन तंत्रज्ञान आणि पोर्टेबल ईव्ही अडॅप्टरचे सादरीकरण केले. समृद्धी महामार्गावर या तंत्रज्ञानाचा वापर करून यंत्रणा उभारण्याबाबत या वेळी चर्चा करण्यात आली. उच्च दर्जाच्या तांब्याच्या धातूसाठी प्रसिद्ध असलेल्या चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याच्या भेटीसाठी कंपनीला निमंत्रण देण्यात आले.

याच दरम्यान इंडो -जर्मन चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीने महाराष्ट्रात जर्मन कंपन्यांकडून गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी आणि महाराष्ट्र आणि बार्डन वुर्टेमबर्ग यांच्यातील द्विपक्षीय संबंध वाढवण्यासाठी गोलमेज परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी अँड्रियास लॅप (बार्डन वुर्टेमबर्गचे भारताचे वाणिज्यदूत), थॉमस फुरमन ( स्टुटगार्ट शहराचे उपमहापौर), जोहान्स जंग (आर्थिक व्यवहार मंत्रालयाचे विभाग प्रमुख), सिमोन गोहरिंग ( सल्लागार, बार्डन वुर्टेमबर्ग राज्य मंत्रालय), थॉमस मॅथ्यू (मर्सिडीज बेंझ), बर्नहार्ड ग्रीब (स्टुटगार्ट शहराच्या आर्थिक विकासाचे प्रमुख), खैलाश भट्ट (जर्मनीतील भारतीय वाणिज्य दूत), ट्रम्प कंपनीचे सीईओ रिचर्ड बॅनम्युलर, गेरहार्ड कुबलर (फ्रिट्झ कुब्लरच्या व्यवस्थापकीय संचालक), बार्बरा एफेनबर्गर (स्टटगार्टच्या कॉमर्स आणि इंडस्ट्री चेंबर) आणि जोएल मिटनाच्ट (भारतीय वाणिज्य दूतावासाच्या प्रमुख) आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news