Colonel Purohit Pune Celebration
पुणे: मालेगावातील भिक्कू चौकात 29 सप्टेंबर 2008 रोजी झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील संशयित माजी खासदार साध्वी प्रज्ञासिंह, कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह सर्व सात संशयितांची निर्दोष मुक्तता झाल्याचे वृत्त धडकताच पुण्यात कर्नल पुरोहित यांच्या घरासमोर पतित पावन संघटनेकडून जल्लोष करण्यात आला.
लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांची मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात निर्दोष मुक्तता झाली. त्यामुळे पतित पावन संघटनेकडून गुरुवारी (दि.31) एरंडवणे भागातील पुरोहित यांच्या घरासमोर जल्लोष करण्यात आला. या वेळी येथे पेढे, मिठाईवाटप करण्यासोबतच फटाकेही वाजवण्यात आले. (Latest Pune News)
पुरोहित यांच्या पुण्यातील घरासमोर दुपारी एकच्या सुमारास पतित पावन संघटनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भारत माता की जय, वंदे मातरम, अशी घोषणाबाजी करत त्यांच्या निर्दोष सुटकेबद्दल आनंद व्यक्त केला. तसेच, न्यायालयाचे आभारही मानले.