

पुणे: राज्यातील बहुतांश जिल्ह्यातील पाऊस कमी झाला आहे. मात्र, विदर्भात ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. त्यानुसार काही जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पाऊस बरसणार आहे. मात्र उर्वरित भागात कोकणात किनारपट्टीच्या भागात सोसाट्याच्या वारा वाहणार असून, काही भागात पाऊस, मध्य महाराष्ट्रात हलका तर मराठवाड्यात तुरळक भागात अतिहलका पाऊस हजेरी लावणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार सध्या राज्यातील मुसळधार पाऊस कमी झाला आहे. (Latest Pune News)