अखेर हडपसर टर्मिनलला मिळणार मूलभूत सुविधा

अखेर हडपसर टर्मिनलला मिळणार मूलभूत सुविधा
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा : हडपसर टर्मिनलवरील पायाभूत सुविधांची कामे येत्या एप्रिल महिन्यात करण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यातील या कामांसाठी तब्बल 2 कोटींपर्यंत खर्च करण्यात येणार असून, यासंदर्भात टेंडर प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. हडपसर टर्मिनलवरील सद्य:स्थिती आणि पायाभूत सुविधांची वानवा दाखविणारे वृत्त दैनिक 'पुढारी'मध्ये दि. 12 रोजी प्रसिध्द करण्यात आले होते. त्याची दखल घेत रेल्वे प्रशासनाने हडपसर टर्मिनलवर युद्धपातळीवर पायाभूत सुविधा उभ्या करण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे प्रवाशांची लवकरच येथे पायाभूत सुविधांपासून होणार्‍या त्रासापासून मुक्तता होणार आहे.

गाड्यांचे होणार स्थलांतर…
पुणे रेल्वेस्थानकाच्या यार्ड रिमॉडलिंगच्या कामामुळे पुणे रेल्वेस्थान कावरून धावणार्‍या काही एक्स्प्रेस गाड्या हडपसर स्थानकातून सोडण्याचे नियोजन आहे. मात्र, हडपसर स्थानकावर पायाभूत सुविधाच नाहीत. यासंदर्भात वृत्त प्रसिद्ध केल्यावर रेल्वे प्रशासनाला जाग आली आहे.

रस्ता रुंदीकरणाबाबत महापालिकेला पत्र…
हडपसर टर्मिनलवर उतरल्यावर प्रवाशांना मुख्य रस्त्यावर जाण्यासाठी दीड ते दोन किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे. प्रवाशांना पीएमपीची फीडर सेवा मिळणे आवश्यक आहे. मात्र, मुख्य रस्त्यापासून हडपसर टर्मिनलला जाणारा रस्ता काही ठिकाणी अरुंद आहे. हा रस्ता रुंद करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने महापालिकेला पत्र दिले असून, यासंदर्भात चर्चा सुरू आहे.

हडपसर रेल्वेस्थानकावरील विकासकामांसाठी 135 कोटींची आवश्यकता आहे. परंतु, येत्या एप्रिल महिन्यात आम्ही प्रवाशांच्या सोयीकरिता 2 कोटी रुपयांपर्यंतची येथील कामे करणार आहोत. याची टेंडर प्रक्रिया सध्या सुरू आहे.

                            – इंदू दुबे, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, पुणे विभाग

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news