पुणे : गुंगीचे औषध देऊन बाऊन्सर महिलेवर बलात्कार

अल्पवयीन मुलीवर अत्याचार
अल्पवयीन मुलीवर अत्याचार

पुणे : पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर येथे एका कार्यक्रमासाठी जायचे असल्याचे सांगून महिला बाऊन्सरला लॉजवर नेऊन तिला पाण्यातून गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या महिलेला दुसर्‍याच एकाने आरोपीचा नंबर दिला होता. त्यानुसार तिने संबंधीत नंबरवर संपर्क साधला. त्यानंतर कोल्हापूरला जाण्याचे ठरले होते. त्यानुसार महिला गेली असता बुधवारी मध्यरात्री कात्रज परिसरातील हॉटेल किनारा येथे मध्यरात्री सदर प्रकार घडला असून, याबाबत पिडित 28 वर्षीय महिलेने भारती विद्यापीठ पोलीसांकडे आरोपी विरोधात फिर्याद दिली आहे. आरोपी फरार झाला असून, तांत्रिक विश्लेषणावरून पोलिस त्याचा शोध घेत आहे.

सहायक पोलिस निरीक्षक जी. डी. घावटे यांनी सांगितले, फिर्यादी ह्या बाउंसर असून तिला कोल्हापूर येथे एक इव्हेंट करायचा असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर तिला कात्रज येथे बोलविण्यात आले. आरोपीने त्याठिकाणी महिलेकडून प्रवास खर्चाकरिता सात हजार रुपये ही घेतले. तिला रात्री उशीरा पहाटे तीन आपली गाडी असून तोपर्यंत आपण लॉजवर थांबू असे सांगिण्यात आले. तेथे तिला आरोपीने पिण्याच्या पाण्याच्या बाटलीतून गुंगीचे औषध दिले. त्यानंतर तिच्यावर अत्याचार केला.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news