पुणे : पुढारी वृत्तसेवा : नव्या पिढीच्या राष्ट्रपिता कदाचित नथुराम गोडसे होईल असे वातावरण आज देशात तयार केले जात आहे अशी खंत महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी येथे एका कार्यक्रमात व्यक्त केली. श्री जैन सामुदायिक उत्सव समिती श्री सकळ जैन संघ पुणे यांच्या वतीने गांधीवादी विचारवंत दिवंगत सुखलाल जैन यांच्या नावाने जिन महावीर ज्ञान विज्ञान पुरस्कार हा पहिला पुरस्कार तुषार गांधी यांना देण्यात आला यावेळी ते बोलत होते.
तुषार गांधी म्हणाले, 'महात्मा गांधी यांच्या नावाने रोज नवीन खुलासे करावे लागत आहेत. दिवस उगवला की आज कोणता खुलासा करावा लागेल याची चिंता लागून राहते. आज समाजात पराकोटीचा द्वेष आणि घृणा करणे हा प्रकार इतका पराकोटीला गेलाय की नव्या पिढीचा राष्ट्रपिता नथुराम गोडसे होईल की काय अशी भीती वाटते.