

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : शहरातील नागरिकांची फसवणूक करीत, बनावट औषधे खरी असल्याचे भासवून ती विक्रीसाठी ठेवल्याप्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागाने (एफडीए) कारवाई केली आहे. यामध्ये औषध विक्रेते आणि पुरवठादारांवर गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई 29 जून ते 20 जुलै या कालावधीत भुमकर चौक आणि इतर ठिकाणी करण्यात आली.
याविरोधात अन्न व औषध प्रशासन विभागाचे सह आयुक्त विकास पाटील यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. आरोपींनी आपापसात संगनमत करून बनावट औषधे खरी असल्याचे भासवून मेडिकल दुकानांमध्ये विक्रीसाठी ठेवली. त्यानुसार आरोपी सतीश रमेश चव्हाण (रा. वाकड), सिकंदर पुजारा (रा. अहमदाबाद), लोकेश सुकनिया खंडेलवाल (रा. जोधपुर), आदित्य कृष्ण (रा. बिहार), कामत ड्रग एजन्सी (पनवेल) आणि इतर अज्ञातांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींनी रुग्णांची व शासनाची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. बनावट औषधांची विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर अन्न व औषध प्रशासन विभागाने ही कारवाई केली आहे.
हेही वाचा