Pune Crime | तरुणीला भेटण्यासाठी गेलेल्या तरुणावर जीवघेणा हल्ला

धानखरेदी गैरव्यवहार
धानखरेदी गैरव्यवहार

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : तरुणीला भेटण्यासाठी गेलेल्या तरुणाच्या अंगावर गाडी घालून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना मंगळवारी (दि. 28) मध्यरात्री एकच्या सुमारास यशवंतनगर, पिंपरी येथे घडली.

निलेश दिलीप शिंदे (30, रा. गवळीमाथा, भोसरी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. सुशील भास्कर काळे (41, रा. थेरगाव) याला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी शरद जगन्नाथ टिळक (25, रा. नेहरूनगर, पिंपरी) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

नेमके काय घडले?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निलेश शिंदे यांचे एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. मागील काही दिवसांपूर्वी त्यांच्यात वाद झाला होता. दरम्यान, निलेश यांनी तरुणीला भेटण्याची इच्छा व्यक्त करत तिला यशवंतनगर येथे बोलावून घेतले. तरुणीने हा प्रकार आरोपीला सांगितला.

दरम्यान, मंगळवारी मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास निलेश दुचाकीवर बसून तरुणीसोबत बोलत होते. त्या वेळी आरोपी पाठीमागून कार घेऊन तेथे आला. भरधाव कारने निलेश यांच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत निलेश दुचाकीवरून खाली पडले. त्यानंतर त्यांना ठार मारण्याच्या उद्देशाने आरोपीने त्यांच्या अंगावर कार घालण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आरोपीने कारमधून उतरून निलेश यांच्या तोंडावर, छातीवर लाथा मारल्या. यामध्ये निलेश हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पिंपरी पोलिस तपास करीत आहेत.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news