दौंड: महावितरणच्या तारांचा शेतकर्‍यांना फटका

दौंड: महावितरणच्या तारांचा शेतकर्‍यांना फटका
Published on
Updated on

रावणगाव : महावितरण कंपनीच्या विद्युत पुरवठा करणार्‍या दोन खांबांमधील अंतर जास्त असल्याने कमी उंचीवरून जाणार्‍या विद्युत पुरवठा तारांचा झोळ शेतात पडत आहे. यामुळे रावणगाव (ता.दौंड) परिसरातील ऊस उत्पादक बागायतदार शेतकर्‍यांना महावितरणच्या हलगर्जीपणाचा त्रास सहन करावा लागत आहे.

रांधवण वस्ती येथील देवराम पवार यांच्या शेतातून जाणार्‍या विद्युत पुरवठ्याच्या तारा या दोन खांबांमधील अंतर जास्त असल्याने कमी उंचीवरून जात आहेत. यामुळे भविष्यात शेतकर्‍यांच्या ऊस पिकाला धोका निर्माण होऊ शकतो. तसेच जीवित आणि वित्तहानी होऊ शकते. महावितरणने याबाबत त्वरित कार्यवाही करत एक अतिरिक्त खांब बसविण्याची मागणी येथील शेतकर्‍यांनी केली आहे.

विशेष म्हणजे एक जागरूक वीज ग्राहक पद्माकर कांबळे व त्यांचे वडील जी. बी. कांबळे यांनी याबाबत महावितरणच्या संबंधित वीज कर्मचारी, वीजतंत्री यांना मागील वर्षीपासून सातत्याने ही बाब निदर्शनास आणून दिली. परंतु महावितरणने अद्याप याची दखल घेतली नाही. कृषी पंपाचे तसेच घरगुती वीज देयक वेळेवर भरून शून्य थकबाकी असताना महावितरण आमच्या मागणीकडे दुर्लक्ष करत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news