पुणे: पालाशची मात्रा शेतकर्‍यांनी ठरवावी, कृषी संचालक दिलीप झेंडे यांचे आवाहन

पुणे: पालाशची मात्रा शेतकर्‍यांनी ठरवावी, कृषी संचालक दिलीप झेंडे यांचे आवाहन
Published on
Updated on

पुणे, पुढारी वृत्तसेवा: पोटॅश खते खरेदी करताना खताच्या पिशवीवरील पोटॅशचे प्रमाण वाचून अथवा माहिती घेऊन खताची खरेदी करावी, असे आयुक्तालयातील कृषी संचालक (निविष्ठा व गुणनियंत्रण) दिलीप झेंडे यांनी सांगितले. पिकांना खताची मात्रा वापरतांना उसाच्या मळीपासून प्रक्रिया करून बनविलेले पोटॅश डिराईव्हड फ्रॉममोलॅसिस तथा पीडीएममधून प्रति बॅग 7.25 किलो तर म्युरेट ऑफ पोटॅशमधून प्रति बॅग 30 किलो पालाश मिळते. याचा विचार करून पिकांसाठी खताची मात्रा शेतकर्‍यांनी ठरवावे.

बाजारात म्युरेट ऑफ पोटॅश हे खत मुख्य स्त्रोत म्हणून शेतात वापरले जाते. साधारणतः मिठासारखे दिसणारे चुर्ण किंवा दाणेदार स्वरुपात ही खते बाजारात उपलब्ध आहेत. म्युरेट ऑफ पोटॅश खतामध्ये 60 टक्के पोटॅश म्हणजे पालाशचे प्रमाण असते. म्हणजेच 50 किलोच्या बॅगमध्ये 30 किलो पालाश पिकाला मिळते. परंतु बाजारात उसाच्या मळीपासून प्रक्रिया करून बनविलेले पोटॅश डिराईव्हड फ्रॉम मोलॅसिस (पीडीएम) नावाचे पोटॅश खत उपलब्ध आहे.
यात मात्र पालाशचे प्रमाण 14.50 टक्के म्हणजे 50 किलोच्या बॅगमध्ये साधारण 7.25 किलो पोटॅश पिकाला मिळते. म्युरेट ऑफ पोटॅश व पीडीएम यामध्ये होणार्‍या गफलतीमुळे कृषी विद्यापीठ शिफारशीप्रमाणे खताचे प्रमाण योग्य दिले जात नाही, परिणामी पिकांची वाढ व उत्पादनावर परिणाम होतो.
'कृषिक अ‍ॅप' नावाने राज्याचा कृषी विभाग व बारामती कृषी विज्ञान केंद्राच्या संयुक्त सहकार्याने एक मोबाईल अ‍ॅप तयार केले आहे. त्याचा वापर करून पिकाला खताची मात्रा व किंमत यांचे परिणगना करून खते खरेदी करावी. जेणेकरून शेतकर्‍यांचा पीक उत्पादनावर होणारा खतांचा खर्च कमी होईल. ऊन चांगले व भरघोस उत्पादन मिळेल, असेही त्यांनी सांगितले.

पिकांची गुणवत्ता सुधारण्यासाठी उपयुक्तता…

पोटॅश म्हणजेच पालाशयुक्त खते ही पिकांसाठी उपयुक्त आहेत. पिकांच्या शरीरात सतत होणार्‍या रासायनिक व भौतिक घडामोडीसाठी स्टार्च व शर्करा तयार करणे व त्यांच्या वहनांसाठी व वनस्पतीची खोडे मजबूत होण्यासाठी पालाशचा उपयोग होतो. परिणामी पिकांचे कीड रोगापासून संरक्षण होते. पोटॅश हा उत्पादनाची चव, रंग तजेलदारपणा व टिकावू क्षमता हे गुण ठरवणारा घटक आहे. याचा परिणाम बाजारात चांगल्या प्रतिच्या उत्पादनाला चांगला बाजारभाव मिळण्यास होतो. वातावरणातील अचानक बदलांमुळे पिकावर येणारा जैविक व अजैविक ताणांना सामोरे जाताना पोटॅश पिकांना मदत करत असतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news