Farmer ID Issue : सातबार्‍यावर नाव तरीही निघेना फार्मर आयडी! जिल्ह्यात अद्यापही 4 लाख 85 हजार जण आयडीविना

हजारो शेतकरी कृषी विभागाच्या योजनांपासून वंचित
Farmer ID
सातबार्‍यावर नाव तरीही निघेना फार्मर आयडी! जिल्ह्यात अद्यापही 4 लाख 85 हजार जण आयडीविनाFile Photo
Published on
Updated on

राजगुरुनगर: केंद्र शासनाने देशभरातील शेतकर्‍यांसाठी ‘फार्मर युनिक आयडी’ (Farmer Unique ID) देण्याची योजना सुरू केली. गावोगावी शिबिरे घेऊन मोठ्या प्रमाणावर नोंदणी झाली, मात्र संकेतस्थळाच्या तांत्रिक अडचणीमुळे आजही अनेक शेतकर्‍यांचे सातबार्‍यावर नाव असूनही त्यांना ‘फार्मर आयडी’ मिळत नाही. त्यामुळे हजारो शेतकरी कृषी विभागाच्या योजनांपासून वंचित राहात आहेत.

प्रत्येक भारतीय नागरिकासाठी जसा ‘आधार क्रमांक’ बंधनकारक आहे, तसाच शेतकर्‍यांसाठी ’फार्मर आयडी’ बंधनकारक करण्यात आला आहे. डिसेंबर 2024 मध्ये ही मोहीम सुरू झाली. पुणे जिल्ह्यात आतापर्यंत 5 लाख 54 हजार शेतकर्‍यांचे आयडी तयार झाले आहेत; मात्र 4 लाख 85 हजार शेतकर्‍यांकडे अजूनही आयडी नाही. (Latest Pune News)

Farmer ID
Two-wheeler number series: बारामतीत दुचाकींसाठी नवीन वाहन क्रमांक मालिका

राज्य शासनाने स्पष्ट आदेश दिला आहे की, ‘फार्मर आयडी’शिवाय कोणत्याही कृषी योजनेचा लाभ मिळणार नाही. इतकेच नव्हे, तर ‘महाडीबीटी’ पोर्टलवर लॉगिन करण्यासाठीही ‘फार्मर आयडी’ आवश्यक आहे.

शेतकर्‍यांनी दीड-दोन वर्षांपूर्वी महाडीबीटीवर ऑनलाइन अर्ज केले होते. आता त्यांची निवड झाली असून कागदपत्रे अपलोड करण्यासाठी ‘फार्मर आयडी’ आवश्यक आहे. मात्र आयडी नसल्यामुळे त्यांचे अर्ज रद्द केले जात आहेत. शासनाच्या या निर्णयाचा मोठा फटका शेतकर्‍यांना बसत आहे.

Farmer ID
Gold Scam: स्वस्त सोन्याच्या आमिषाने साडेदहा लाखांची फसवणूक; राजगड पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल

फळबाग अनुदानातही खोळंबा

कृषी विभागाच्या फळबाग लागवड योजनेसाठी तीन वर्षांमध्ये टप्प्याटप्प्याने अनुदान दिले जाते. पहिल्या वर्षी अनुदान मिळालेल्या अनेक शेतकर्‍यांकडे दुसर्‍या व तिसर्‍या वर्षासाठी आवश्यक ’फार्मर आयडी’ नसल्यामुळे त्यांना पुढील अनुदान मिळालेले नाही.

अ‍ॅग्रीस्टॅकमधील माहिती ऑक्टोबर 2024 पर्यंतची होती. आता लाईव्ह डेटा उपलब्ध असून ‘"My Name is not found in the list' या सुविधेमुळे शेतकर्‍यांना नव्याने नोंदणी करता येते. ही सेवा सीएससी केंद्र व सेल्फ नोंदणीसाठी खुली आहे. सर्व शेतकर्‍यांनी तातडीने ’फार्मर आयडी’ काढावा.’

- जितेंद्र डुडी, जिल्हाधिकारी, पुणे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news