चाकण : महिला, बाऊन्सर आणून शेतजमिनीचा घेतला ताबा

चाकण : महिला, बाऊन्सर आणून शेतजमिनीचा घेतला ताबा

चाकण(पुणे); पुढारी वृत्तसेवा : मालकाच्या परस्पर जमिनीचा व्यवहार आणि ताबा घेण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी काही भूमाफियांवर महाळुंगे एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार खेड तालुक्यातील भांबोली येथे घडला आहे. याप्रकरणी संजय कचरू नवरे (वय 53, रा. भांबोली) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, ताबा घेण्यासाठी आलेल्या काही महिला आरोपी, त्याचप्रमाणे पांडुरंग ज्ञानेश्वर खुटाळ, सचिन संतराम नाईकनवरे आणि त्यांचे 7 ते 8 साथीदार यांच्यावर महाळुंगे एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांच्या भावंडांच्या मालकीची 111 गुंठे जमीन आहे. आरोपींनी फिर्यादींना कोणतीही कल्पना न देता 49 गुंठे जमीन विकली व शिल्लक शेतजमिनीपैकी 17.35 गुंठे जमीन जी फिर्यादी, त्यांची आई व मयत बहिणीच्या नावावर असतानादेखील आरोपींनी बाऊन्सर घेऊन येत जबरदस्तीने कपांऊड घालण्यास सुरुवात केली. त्यांना फिर्यादीने विरोध केला असता, फिर्यादीस शिवीगाळ करत धमकी दिली. यावरून महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news