Extra ST buses: एसटीच्या भीमाशंकरसाठी 80 गाड्या; श्रावणानिमित्त अतिरिक्त गाड्यांचे पुणे विभागाचे नियोजन
पुणे: श्रावणानिमित्ताने एसटीच्या पुणे विभागाकडून ज्यादा गाड्या सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. भीमाशंकर ते पार्कींग यादरम्यान भाविकांसाठी 50 गाड्या सोडण्यात आल्या आहेत. तर शिवाजीनगर, खेड, मंचर डेपोतून नियमित 30 गाड्या धावणार आहे, अशा एकूण 80 गाड्या भीमाशंकरसाठी धावणार आहे.
श्रावण महिन्यात भीमाशंकर देवस्थान येथे भाविक आवर्जुन दर्शनाला जातात. त्यानिमित्ताने एसटीच्या पुणे विभागाकडून दरवर्षी जादा गाड्या सोडल्या जातात. यंदाही ज्यादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. (Latest Pune News)
गौरी, गणपतीसाठी जादा गाड्यांचे नियोजन सुरू
गौरी, गणपती सणासाठी कोकण भागात जाणार्या भाविकांची जादा गर्दी असते. त्याकरिता देखील एसटीकडून ज्यादा गाड्या सोडण्यात आल्या होत्या. मागील वर्षी 80 ग्रुप बुकींग आणि 146 आरक्षण बुकींगच्या गाड्या होत्या. यंदाही असेच नियोजन असणार आहे. मात्र, आणखी गाड्यांची आवश्यकता भासल्यास, त्याचेही नियोजन केले जाणार असल्याचे एसटी प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
श्रावणानिमित्त भीमाशंकर ते पार्कींगदरम्यान आम्ही 50 गाड्या सोडल्या आहेत. तसेच, शिवाजीनगर, खेड-मंचर आगातील नियमित गाड्या धावणार आहेत. त्याशिवाय गाड्यांची आणखी आवश्यकता असल्यास सोडण्यात येतील.
- अरुण सिया, विभाग नियंत्रक, एसटी, पुणे विभाग

