

Ajit Pawar on Dhananjay Munde
पुणे: धनंजय मुंडे यांच्यावर कृषी विभागातील खरेदीप्रकरणी झालेल्या आरोपाबाबत न्यायालयाने ‘क्लीन चिट’ दिला आहे. त्यांच्या अजून एका प्रकरणाची न्यायालयीन चौकशी सुरू असून, ती पूर्ण झाल्यानंतर वस्तुस्थिती पुढे येईल. त्यांचा या प्रकरणाशी दुरान्वयानेही संबंध नसेल, तर त्यांना पुन्हा एकदा संधी देण्याचे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
व्हीआयपी विश्रामगृह येथे आयोजित आढावा बैठकीनंतर ते माध्यमांशी बोलत होते. पवार म्हणाले, न्यायालयाने मुंडे यांना कृषी विभाग प्रकरणात कुठेही दोषी ठरविले नाही. मात्र, त्यांची बदनामी व्हायची ती झाली आहे. ज्यांनी आरोप केले त्यांना न्यायालयाने 1 लाखांचा दंड केला आहे. आपल्या देशात न्यायालय ही सर्वोच्च यंत्रणा असून, त्यांनी तो निर्णय दिला आहे. (Latest Pune News)
कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंसंदर्भात सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करण्यात येईल. त्याबाबतचा निर्णय मंगळवारी जाहीर केला जाईल, असेही पवार यांनी स्पष्ट केले. आमदार रोहित पवारांनी केलेल्या फोन टॅपिंगच्या आरोपावर बोलताना अजित पवार म्हणाले, आरोप करणार्यांनी पुरावेही दिले पाहिजेत.