मोहननगर, उद्याननगर गृहप्रकल्पांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ

मोहननगर, उद्याननगर गृहप्रकल्पांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ
Published on
Updated on

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड महापालिकेने पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आर्थिक दुर्बल घटकांसाठी आकुर्डी (मोहननगर) व पिंपरी (उद्यमनगर) येथील गृहप्रकल्पातील 938 सदनिकांसाठी ऑनलाइन अर्ज मागविले आहेत. त्यासाठी मुदत 27 ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आली आहे. आतापर्यंत एकूण 10 हजार 688 अर्ज महापालिकेस प्राप्त झाले आहेत.

मोहननगर येथील गृहप्रकल्पात एकूण 568 सदनिका आहेत. तर, उद्यमनगर येथील गृहप्रकल्पात एकूण 370 सदनिका आहेत. हे दोन्ही गृहप्रकल्प तयार आहेत. सदनिकेसाठी सर्वसाधारण, अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी), इतर मागासवर्ग (ओबीसी) व दिव्यांग असे आरक्षण आहे. मोहननगर येथील सदनिकेसाठी 7 लाख 35 हजार 255 रुपये आणि उद्यमनगर येथील सदनिकेसाठी 7 लाख 92 हजार 699 रुपये स्वहिस्सा लाभार्थ्यांना भरावा लागणार आहे. या घरांसाठी नागरिकांकडून 28 जूनपासून ऑनलाइन अर्ज स्वीकारण्यास सुरुवात करण्यात आली आहे. ती मुदत संपल्यानंतर 12 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. आता ही मुदत वाढून 27 ऑगस्ट करण्यात आली आहे.

आतापर्यंत एकूण 10 हजार 688 नागरिकांनी ऑनलाइन अर्ज केले आहेत. अर्जासोबत नागरिकांनी 10 हजार रुपये अनामत रक्कम व 500 रुपये नोंदणी शुल्क आणि आवश्यक कागदपत्रे ऑनलाइन जमा केली आहेत. उद्यमनगर येथील सदनिकांसाठी 4 हजार 282 जणांनी आणि मोहननगर येथील सदनिकांसाठी 6 हजार 306 जणांनी अर्ज भरले आहेत.

आवश्यक कागदपत्रांसाठी मुदतीमध्ये वाढ

मोहननगर व उद्यमनगर येथील दोन गृहप्रकल्पांसाठी शहरातील नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आवश्यक कागदपत्रे मिळण्यासाठी विलंब होत असल्याने अर्ज करण्यासाठी 27 ऑगस्टपर्यंत मुदत वाढविण्यात आली आहे. मुदतीमध्ये पात्र अर्जाची यादी करून त्यातून सोडत काढण्यात येईल, असे झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागाचे सहायक आयुक्त अण्णा बोदडे यांनी सांगितले.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news