राक्षेवस्तीकडे जाणार्‍या रस्त्यावर खोदकाम

राक्षेवस्तीकडे जाणार्‍या रस्त्यावर खोदकाम

भामा आसखेड : पुढारी वृत्तसेवा : वरची भांबुरवाडी (ता. खेड) येथे राक्षे वस्तीकडे जाणार्‍या पूर्वापार रस्त्यालगत खोदकाम करून अडवणूक करण्यात आली आहे. ओढ्यातून तयार करण्यात आलेल्या रस्त्यावर खोदकाम केल्याने ओढ्याचा प्रवाह अडला गेला आहे. तसेच वस्तीवर राहणार्‍या जवळपास 200 नागरिकांना येण्या-जाण्याची अडचण निर्माण झाली आहे. याप्रकरणी वरची भांबुरवाडीचे सरपंच विजय थिगळे यांनी महसूल विभागाकडे तक्रार दाखल केली आहे.

पुणे-नाशिक महामार्गालगत वरची भांबुरवाडी गाव आहे. डोंगर परिसरात राक्षेवस्ती आहे. वस्तीकडे जाण्यासाठी ओढ्याच्या पात्रालगत माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रयत्नातून सिमेंट काँक्रीट भिंत बांधली आहे, तर ओढ्यापासून पुढील रस्त्यावर आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या निधीतून काम करण्यात आले आहे. काँक्रीट भिंतीलगत आपली मालकी जागा असल्याचे सांगत एका नागरिकाने ओढा खोदला आहे. त्यामुळे वस्तीकडे जाणार्‍या रस्त्याची अडचण निर्माण झाली आहे. पावसाळा जवळ आला आहे.

ओढ्याला मोठा पूर येतो. पुराच्या पाण्याने मूळ रस्त्याची भिंत वाहून जाण्याचा धोका आहे. तसेच कडेचे विजेचे खांब पडून धोका निर्माण होऊ शकतो. लहान मुले शाळेत जाताना-येताना तसेच वयोवृद्धांचे हाल होणार आहेत. प्रशासनाने लवकरात लवकर रस्ता सुरळीत करावा; अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा ह.भ.प. पोपट महाराज राक्षे, शांताराम राक्षे व ग्रामस्थांनी दिला आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news